विशेष प्रतिनिधी, मुंबई
रिलायन्स जिओने ५ नवे जबरदस्त प्लॅन लाँच केले आहेत. नो डेली डाटा लिमिट Jio Freedom या नावाने प्लॅन्स ओळखले जातील. नो डेली लिमिट प्रीपेड प्लॅन्समध्ये डाटा वापरण्यासाठी युजर्सना कोणतीही मर्यादा नसेल. या प्लॅन्समध्ये दररोज मिळाणार्या डाटाची कोणतीच मर्यादा नाही. प्रीपडेमध्ये १२७ रुपये, २४७ रुपये, ४४७ रुपये, ५९७ रुपये आणि २,३९७ रुपयांचे प्लॅन्स उपलब्ध आहेत. जिओच्या प्लॅन्समध्ये तुम्हाला काय फायदा होणार आहे, हे आपण जाणून घेऊयात.
१२७ रुपये
या नो डेली लिमिट प्लॅनमध्ये युजर्सना १२७ रुपयांमध्ये १२ जीबी डाटा मिळणार आहे. त्याअंतर्गत तुम्ही दररोज अमर्यादित डाटाचा वापर करू शकरणार आहात. प्लॅनची व्हॅलिडिटी १५ दिवस आहे.प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगचा फायदा मिळणार आहे. या प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएससह जिओच्या अॅपचे मोफत सब्सक्रिप्शन मिळणार आहे.
२४७ रुपये
जिओच्या या प्लॅनमध्ये युजर्सना २४७ रुपयांत एकूण २५ जीबी डाटा मिळणार आहे.युजर दररोज अमार्यादित डाटा वापरू शकतो. प्लॅनची व्हॅलिडिटी ३० दिवसांची आहे. प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगचा फायदा मिळणार आहे. दररोज १०० एसएमएस पाठविण्याची सुविधाही आहे. युजर्सना जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शनही मिळणार आहे.
४४७ रुपये
जिओच्या या प्लॅनमध्ये युजर्सना ४४७ रुपयांत एकूण ५० जीबी डाटा मिळणार आहे. प्लॅनची व्हॅलिडिटी ६० दिवसांची आहे. प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगचा फायदा मिळणार आहे. दररोज १०० एसएमएस पाठविण्याची सवलत मिळणार आहे. युजर्सना जिओ अॅप्सचे मोफत सब्सक्रिप्शनही मिळणार आहे.
५९७ रुपये
नो डेली डाटा लिमिट या वर्गात रिलायन्स जिओचे ५९७ आणि २३९७ रुपयांचे प्लॅनही उपलब्ध आहेत. ५९७ रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सना ७५ जीबी डाटा मिळणार आहे. प्लॅनची व्हॅलिडिटी ९० दिवसांची आहे. प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग, दररोज १०० एसएमएसची सुविधा आणि जिओचे सब्सक्रिप्शन मिळणार आहे.
२३९७ रुपये
२३९७ रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सना ३६५ जीबी डाटा दिला जाणार आहे. दररोज अमर्यादित डाटाचा वापर करता येणार आहे. प्लॅनची व्हॅलिडिटी ३६५ दिवसांची आहे. प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर मोफत कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचे मोफत सब्सक्रिप्शन मिळणार आहे.