पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मोबाईल ग्राहकांसाठी वेगवेगळ्या टेलिकॉम कंपन्यांनी नवीन नवीन प्लॅन बाजारात आणले असून त्यामध्ये सध्या जणू काही स्पर्धा सुरू आहे. त्यातच रिलायन्स जिओने बाजी मारलेली दिसून येते सणासुदीत आजच्या दिवसात ग्राहकांसाठी ही भेट ठरत आहे. रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना होळी सणाची भेट देत दोन नवीन रिचार्ज प्लॅन लॉन्च केले आहेत. कंपनीने वर्क फ्रॉम होम श्रेणी आणि डेटा पॅक या दोन्ही योजना सादर केल्या आहेत. त्यांची किंमत 2,878 रुपये आणि 2,998 रुपये आहे. विशेष म्हणजे यामध्ये तुम्हाला वर्षभरासाठी 2 GB आणि 2.5 GB डेटा मिळणार आहे. दोन्ही योजना कंपनीच्या वेबसाइटवर अपडेट करण्यात आल्या आहेत. त्याचा अधिक तपशील जाणून घेऊ या..
प्लॅन 2,878 रुपये
रिलायन्स जिओचा 2878 रुपयांचा प्रीपेड प्लॅन ग्राहकांना 365 दिवसांसाठी दररोज 2GB डेटा ऑफर करतो. म्हणजेच या प्लानमध्ये तुम्हाला एकूण 730GB GB डेटा मिळेल. एकदा डेटा मर्यादा संपली की, स्पीड 64Kbps पर्यंत घसरेल. हा वर्क फ्रॉम होम डेटा प्लान असल्याने, यात व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएससारखे फायदे मिळत नाहीत.
प्लॅन 2,998 रुपये
जिओच्या नवीन 2998 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनसह, मोबाईल वापरकर्त्यांना 365 दिवसांसाठी दररोज 2.5GB डेटा दिला जाईल. म्हणजेच एका वर्षात एकूण 912.5GB डेटा मिळेल. एकदा डेटा मर्यादा संपली की, स्पीड 64Kbps पर्यंत घसरेल. हा वर्क फ्रॉम होम डेटा प्लान असल्याने, यात व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएससारखे फायदे मिळत नाहीत.
वर्क फ्रॉम होम प्लॅन :
जीओ कंपनीकडे 181 रुपये, 241 रुपये आणि 301 रुपयांचे आणखी 3 वर्क फ्रॉम होम प्लॅन आहेत. हे तिन्ही प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसह देण्यात येतात. 181 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 30 जीबी 241 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 40 जीबी आणि 301 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 50 जीबी डेटा दिला जातो.