विशेष प्रतिनिधी, मुंबई
रिलायन्स जिओने फायबर वापरकर्त्यांसाठी अनेक नवीन पोस्टपेड योजना आणल्या आहेत. या योजना दरमहा ३९९ रुपयांपासून सुरू होतील. नवीन योजना सुरू करण्याबरोबरच कंपनीने जाहीर केले आहे की सर्व नवीन वापरकर्त्यांना योजनेसह इंटरनेट बॉक्स म्हणजेच राऊटर फ्री मिळेल. ग्राहकांना कोणतेही इन्स्टॉलेशन फी भरावे लागणार नाही. एकंदरीत ग्राहकांना १५०० रुपयांपर्यंतची बचत मिळेल. वापरकर्त्यांना किमान ६ महिन्यांच्या वैधतेची योजना विकत घेतल्यासच विनामूल्य राऊटर आणि विनामूल्य इन्स्टॉलेशनचा लाभ मिळेल. सर्व योजना १७ जूनपासून लागू होतील.
रिलायन्स जिओच्या नव्या पोस्टपेड योजनेचे मुख्य आकर्षण म्हणजे समान अपलोड आणि डाऊनलोड गती . वापरकर्त्यांना ३९९ रुपयांच्या योजनेत ३० एमबीपीएस, ६९९ रुपयांच्या योजनेत १०० एमबीपीएस, ९९९ रुपयांच्या योजनेत १५० एमबीपीएस आणि १४९९ रुपयांच्या योजनेत ३०० एमबीपीएस अपलोड आणि डाउनलोड गती मिळतील. याशिवाय जिओफायबरवर १ जीबीपीएस पर्यंतची योजना देखील उपलब्ध आहे.
रिलायन्स जिओच्या ९९९ रुपयांच्या पोस्टपेड जियोफायबर कनेक्शनमुळे ग्राहकांना विनामूल्य ओटीटी अॅप्सचा लाभही मिळणार आहे. अमेझॉन प्राइम, डिस्ने हॉटस्टार, सोनी लिव्ह, जी 5, वूट सिलेक्ट, सन नेक्ट आणि होईचोई अशी १४ लोकप्रिय ओटीटी अॅप्स असतील. १४९९ योजनेत नेटफ्लिक्ससह सर्व १५ ओटीटी अॅप्स समाविष्ट असतील. या अॅप्सचे बाजार मूल्य ९९९ रुपये आहे. ओटीटी अॅप्स चांगल्या पद्धतीने चालण्यासाठी १००० रुपये सिक्युरिटी डिपॉझिट घेऊन ही कंपनी ग्राहकांना विनामूल्य ४ के सेट टॉप बॉक्सची सुविधा देईल.
—