पुणे – सरकारी तसेच खासगी टेलिकॉम कंपन्यांमध्ये मोबाईलधारक ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी नवनवीन योजना आणल्या जात आहेत. सहाजिकच त्यामध्ये सध्या खूपच स्पर्धा दिसत असून यात रिलायन्स जिओने बाजी मारलेली दिसून येत आहे. कारण रिलायन्स जिओ जवळजवळ दर महिन्याला ग्राहकांसाठी वेगळे प्लॅन्स आणत असून त्यामध्ये ग्राहकांचा फायदा होत असल्याचे म्हटले जात आहे.
आता नव्या प्लॅनमध्ये रिलायन्स जिओकडे उच्च डेटा आणि मूल्य रिचार्ज योजना दोन्ही आहेत. या प्लॅनची वैधता 14 दिवसांपासून ते 365 दिवसांपर्यंत आहे. जिओचा एक प्लान अतिशय परवडणारा आहे. 28 दिवसांच्या (सुमारे एक महिना) वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये महिन्याची किंमत फक्त 75 रुपये आहे. हा रिलायन्स जिओच्या जिओ फोनचा रिचार्ज प्लान आहे. चला तर मग जाणून घेऊ या की, या 75 रुपयांच्या या प्लॅनमध्ये युजर्सना काय फायदे आहेत…
रिलायन्स जिओच्या 75 रुपयांच्या या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग उपलब्ध आहे. प्लॅनमध्ये एकूण 3GB डेटा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या परवडणाऱ्या प्लॅनमध्ये मोबाईल वापरकर्त्यांना 50 एसएमएस पाठवण्याच्या सुविधेसह जिओ अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते.
जिओच्या लोकप्रिय प्लॅनमध्ये एक रिचार्ज 98 रुपयांचा आहे. जिओच्या या प्लानमध्ये यूजर्सना 14 दिवसांची वैधता मिळते. प्लॅनमध्ये दररोज 1.5GB डेटा दिला जातो. विशेष म्हणजेच जिओच्या या प्लानमध्ये एकूण 21 जीबी डेटा उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर मोफत कॉलिंगचा लाभ मिळतो. तसेच 100 रुपयांपेक्षा कमी रिचार्ज प्लॅनमध्ये Jio अॅप्सचे सबस्क्रिप्शनही मोफत उपलब्ध आहे. मात्र, या प्लॅनमध्ये एसएमएस पाठवण्याची सुविधा उपलब्ध नाही.