इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
रिलायन्स जिओने फिक्स्ड वायरलेस अॅक्सेस (FWA) सेवा क्षेत्रात जगात नंबर १ स्थान मिळवले आहे. सध्या ७४ लाखांहून अधिक ग्राहक जिओच्या FWA सेवेशी जोडले गेले आहेत. अमेरिकेच्या टी-मोबाईल कंपनीला मागे टाकत जिओ या क्षेत्रात अग्रस्थानी पोहोचले आहे. FWA अंतर्गत जिओ “एअर फायबर” ही सेवा चालवतो.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या तिमाही निकालांमध्ये चेअरमन मुकेश अंबानी यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, जिओ एअर फायबरसोबतच जिओ फायबर सेवाही उत्कृष्ट कामगिरी करत आहे. कंपनीने आतापर्यंत २ कोटींपेक्षा अधिक परिसरोंना नेटवर्कद्वारे जोडले आहे.
5जी क्षेत्रातही जिओने आघाडी घेतली असून, जिओ ट्रू ५जी नेटवर्कवर सध्या २१ कोटी ३० लाखांहून अधिक ग्राहक सक्रिय आहेत. आर्थिकदृष्ट्याही जिओने ठसा उमटवला आहे. जिओचा ARPU (प्रति ग्राहक सरासरी मासिक महसूल) वाढून २०८.८ कोटी झाला असून कंपनीचा निव्वळ नफा वर्षभरात २४.८
टक्के वाढून ७,११० कोटींवर पोहोचला आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी म्हणाले, “आमच्या डिजिटल सेवा व्यवसायाने सातत्याने मजबूत आर्थिक व कार्यप्रदर्शनासह बाजारातील आपली स्थिती अधिक दृढ केली आहे. मोबिलिटी, ब्रॉडबँड, एंटरप्राइझ कनेक्टिव्हिटी, क्लाऊड आणि स्मार्ट होम्समधील जिओच्या बहुआयामी सेवा ऑफरिंगमुळे आम्ही एक विश्वासार्ह भारतीय तंत्रज्ञान भागीदार म्हणून स्थापित झालो आहोत.”
30 जून 2025 अखेर जिओ नेटवर्कशी एकूण ४९ कोटी ८१ लाखांहून अधिक ग्राहक जोडले गेले होते. याच तिमाहीत कंपनीने निव्वळ ९९ लाख नवीन ग्राहक जोडले. याप्रसंगी जिओच्या ग्राहकांनी दरमहा सरासरी ३७ GB डेटा वापर केला असून, हे वापर प्रमाण उद्योगात सर्वाधिक आहे. जिओचे एकूण डेटा ट्रॅफिकही २४ टक्के वाढून ५४.७ अब्ज GB वर पोहोचले आहे.