विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली :
रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी स्वस्त आणि तगडे रिचार्ज प्लॅन आणले आहेत. जिओचे असे एकूण 5 प्लॅन असून त्यात ग्राहकांना कमीत कमी किंमतीत 1GB डेटा अधिक मिळतो.
या सर्व दीर्घ योजनेत दीर्घ वैधतेसह अनेक सुविधा देण्यात येतात. या योजनांची किमान वैधता किमान 56 दिवस आहे. या सर्व योजनामध्ये मोफत कॉलिंग सुविधा आणि दररोज 100 एसएमएस देखील देण्यात देतात. तर रिलायन्स जिओच्या अशा 5 प्रीपेड योजनांबद्दल जाणून घेऊ या…
3,499 रुपयांचा प्लॅन – 3.10 रुपयांमध्ये 1GB डेटा : हा जिओचा दीर्घकालीन प्रीपेड प्लॅन असून यात 365 दिवसांच्या कालावधीसाठी दररोज 3GB डेटा देण्यात येतो. या योजनेत मोबाईल वापरकर्त्यांना एकूण 1095GB डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये व्हॉईस कॉलिंग अमर्यादित असून दररोज 100 एसएमएस मिळतात.
2,399 रुपयांचा प्लॅन – 3.20 रुपयांमध्ये 1GB डेटा : ही एक दीर्घकालीन योजना असून 365 दिवसांच्या वैधतेसह देण्यात येते, दररोज 2GB डेटा ऑफर करते, एकूण मिळणारा डेटा 730GB आहे आणि त्याची किंमत 3.28 रुपये प्रति GB आहे.
599 रुपयांचा प्लॅन – 3.50 रुपयांमध्ये 1GB डेटा : हा प्लान 84 दिवसांच्या वैधता आणि 2GB दैनिक डेटासह देण्यात येतो. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांसाठी उपलब्ध एकूण डेटा 168GB असून त्याची किंमत 3.50 रुपये प्रति GB आहे.
999 रुपयांचा प्लॅन – 3.90 रुपयांमध्ये 1GB डेटा : कंपनीचा आणखी एक प्रीपेड प्लॅन प्रति जीबी 3.90 रुपयांच्या किंमतीमध्ये 999 रुपयांचा प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये 84 दिवसांच्या कालावधीसाठी दररोज 3GB डेटा आहे, मोबाईल वापरकर्त्यांना या प्लॅनमध्ये एकूण 252GB डेटा मिळतो.
444 रुपयांचा प्लॅन – 3.90 रुपयांमध्ये 1GB डेटा : ही एक अल्पकालीन योजना असून यात 56 दिवसांची वैधता देण्यात देते. यात दररोज 2GB डेटा मिळतो. म्हणजेच, मोबाईल वापरकर्त्यांना प्लॅनमध्ये एकूण 112G