विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली :
मोबाईल ग्राहकांच्या सुविधेसाठी रिलायन्स जिओने पूर्वी काही नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन लॉन्च केले आहेत. या योजनेत नवीनतम डिस्ने प्लस हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शनसह देण्यात येतात. तसेच यामध्ये, कोणत्याही नेटवर्कवर मोफत कॉलिंग, जिओ अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन, दररोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा यासह अनेक फायदे उपलब्ध आहेत. या प्लॅन लाँच झाल्यानंतर काही दिवसांनी रिलायन्स जिओ ने त्यामध्ये अतिरिक्त डेटा देणे सुरू केले असून कोणत्याही शुल्काशिवाय उपलब्ध आहे. प्लॅनमध्ये 10GB पर्यंतचा अतिरिक्त डेटा दिला जात आहे.
अतिरिक्त डेटाचा हा लाभ जिओच्या 499, 888 आणि 2,599 रुपयांच्या प्लॅनमध्ये उपलब्ध आहे. या योजनांमध्ये इतर कोणते फायदे दिले जात आहेत ते जाणून घेऊ या…
नवीन 499 रुपयांच्या प्लॅनमध्ये एकूण 90GB डेटा 6GB अतिरिक्त डेटा : रिलायन्स जिओच्या 499 रुपयांच्या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. या प्लानमध्ये दररोज 3GB डेटा उपलब्ध आहे. याशिवाय प्लानमध्ये 6GB अतिरिक्त डेटा मोफत दिला जातो. म्हणजेच, प्लॅनमध्ये एकूण 90 जीबी डेटा उपलब्ध आहे. प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग उपलब्ध आहे. तसेच, दररोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा आहे. डिस्ने प्लस हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन 1 वर्षासाठी मोफत उपलब्ध आहे. तसेच, जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शनही मोफत आहे.
जिओच्या 888 रुपयांच्या प्लॅनमध्ये 5GB अतिरिक्तसह एकूण 173GB डेटा : रिलायन्स जिओच्या 888 रुपयांच्या प्लॅनची वैधता 84 दिवसांची आहे. या प्लानमध्ये दररोज 2GB डेटा दिला जातो. याशिवाय प्लानमध्ये 5GB अतिरिक्त डेटा दिला जातो. जिओच्या या प्लॅनमध्ये एकूण 173GB डेटा उपलब्ध आहे. प्लॅन कोणत्याही नेटवर्कवर मोफत कॉलिंगचा लाभ देते. डिस्ने प्लस हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन प्लॅनमध्ये 1 वर्षासाठी विनामूल्य उपलब्ध आहे. दररोज 100 एसएमएससह जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे.
वार्षिक 2599 रुपयांच्या प्लॅनमध्ये 10GB अतिरिक्त 740GB डेटा : रिलायन्स जिओच्या 2,599 रुपयांच्या प्लॅनची वैधता 365 दिवस आहे. या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा दिला जातो. याशिवाय प्लॅनमध्ये 10GB अतिरिक्त डेटा दिला जातो. म्हणजेच, प्लॅनमध्ये एकूण 740GB डेटा उपलब्ध आहे. प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग उपलब्ध आहे. डिस्ने प्लस हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन 1 वर्षासाठी मोफत उपलब्ध आहे. या योजनेत दररोज 100 SMS पाठविण्याची सुविधा असलेल्या जिओ अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन देण्यात आले आहे.