इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने ग्राहकांसाठी “मॅचिंग नंबर” ही एक नवीन ऑफर घेऊन आली आहे जिच्यामध्ये ग्राहक आपल्याला हवे असलेले विशिष्ट अंकक्रम असलेला मोबाईल नंबर केवळ ५० रुपयामध्ये निवडू शकतात.
या उपक्रमांतर्गत ग्राहक आपल्या, आपल्या कुटुंबातील सदस्यांचा किंवा मित्रांचा मोबाईल नंबर चार ते सात शेवटच्या अंकांमध्ये समानतेनुसार मॅच करू शकतात.
ग्राहक आपला नवीन जिओ नंबर आपल्या विद्यमान मोबाईल क्रमांकाशी, वाहन क्रमांकाशी, जन्मतारखेशी किंवा एखाद्या लकी नंबरशी मॅच करून निवडू शकतात. जिओच्या या उपक्रमामुळे ग्राहकांना आपली ओळख आणि वैयक्तिक पसंती क्रमांकाच्या माध्यमातून मांडण्याची संधी मिळते.
या ऑफरची वैशिष्ट्ये:
• आपल्या पसंतीचे ४ पर्यंत वैयक्तिक क्रमांक निवडण्याची मुभा
• तुमचा नवीन जिओ नंबर कोणत्याही टेलिकॉम ऑपरेटरच्या नंबरशी मॅच करून निवडता येतो
• अंकमालिकेवर कोणतीही बंधने नाहीत – तुम्हाला प्रिय असलेला कोणताही क्रम निवडा
• ही सेवा केवळ ₹५० (मूळ किंमत ₹५००) मध्ये मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध
ही सेवा कशी मिळवावी:
ग्राहक खालील कोणत्याही सोयीस्कर माध्यमातून ही ऑफर घेऊ शकतात:
• MyJio अॅप, www.jio.com, किंवा जवळच्या अधिकृत जिओ रिटेलरला भेट द्या
• तुमच्या पसंतीचा नंबर शोधा व निवडा
• नोंदणी झाल्यानंतर, ग्राहक मोफत घरपोच सिम वितरण किंवा जवळच्या जिओ स्टोअरला भेट देऊन नंबर निवडू शकतात
नवीन जिओ सिम प्रिपेड प्लॅनवर सक्रिय होईल, त्यासाठी केवायसी व ओळख पडताळणी पूर्ण करणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी www.jio.com ला भेट द्या किंवा MyJio App डाउनलोड करा.