इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
रिलायन्स जिओ ने मे २०२५ मध्ये महाराष्ट्रात १.६३ लाख नवीन मोबाईल ग्राहकांची नोंद करत सर्व टेलिकॉम कंपन्यांमध्ये आघाडी घेतली आहे, अशी माहिती टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) च्या ताज्या अहवालात देण्यात आली आहे. विशेष म्हणजे जिओ ने गेले 3 महिने आपल्या ग्राहकांमध्ये सातत्याने भर घातली आहे .
यासोबतच इतर टेलिकॉम ऑपरेटर्स ने मात्र नाममात्र भर घातल्याचे दिसून येते. ट्राय च्या आकडेवारीनुसार भारती एअरटेल २७१११ तर व्होडा आयडिया ने २८ हजार नवीन ग्राहकांची भर घातली आहे तर बीएसएनएल कडे मात्र ग्राहकांनी पाठ फिरवली असून १७ हजार ग्राहकांनी बीएसएनएल ला सोडचिट्ठी दीली आहे .
राज्यात, फिक्स्ड वायरलेस अॅक्सेस (FWA) क्षेत्रात जिओ आपल्या नेतृत्वाची पुनःस्थापना करत असून, जिओ एअरफायबर सेवा हा स्पष्ट अग्रगण्य पर्याय ठरतो आहे. मे २०२५ मध्ये महाराष्ट्रातील सक्रीय जिओ एअरफायबर वापरकर्त्यांची संख्या ४७११७० इतकी झाली असून तुलनेत एअरटेल चे १३३२२२ ग्राहक नोंदवले आहेत .
जिओ च्या जलद नेटवर्क विस्तार, परवडणाऱ्या योजना आणि एकत्रित डिजिटल सेवांमुळे महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात गृह व व्यावसायिक कनेक्टिव्हिटीमध्ये आमूलाग्र बदल घडतो आहे. शहरी व ग्रामीण भागांतून वेगवान इंटरनेटची वाढती मागणी लक्षात घेता, जिओ ही डिजिटल दरी मिटवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.