इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जिओब्लॅकरॉक अॅसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड (जिओब्लॅकरॉक अॅसेट मॅनेजमेंट) या कंपनीने आपल्या पहिल्याच न्यू फंड ऑफर (NFO) मध्ये तब्बल १७,८०० कोटी रुपये (~USD 2.1 अब्ज) एवढा गुंतवणूक निधी उभारला आहे. कंपनीने सादर केलेल्या तीन कॅश/डेट म्युच्युअल फंडांमध्ये – जिओब्लॅकरॉक ओव्हरनाईट फंड, जिओब्लॅकरॉक लिक्विड फंड आणि जिओब्लॅकरॉक मनी मार्केट फंड – यामध्ये ९० हून अधिक संस्थात्मक गुंतवणूकदार तसेच ६७,००० पेक्षा जास्त वैयक्तिक गुंतवणूकदारांनी NFO कालावधीत गुंतवणूक केली.
जिओब्लॅकरॉक अॅसेट मॅनेजमेंट ही कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (JFSL) आणि ब्लॅकरॉक इंक यांच्यातील संयुक्त उद्यम आहे. या फंडाचा प्रारंभ ३० जून २०२५ रोजी झाला होता आणि ०२ जुलै २०२५ रोजी संपला. भारतातील कॅश/डेट फंड क्षेत्रातला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा NFO ठरला असून, यामुळे जिओब्लॅकरॉक देशातील ४७ म्युच्युअल फंड हाउसेसपैकी टॉप १५ अॅसेट मॅनेजमेंट कंपन्यांमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे.
जिओब्लॅकरॉक अॅसेट मॅनेजमेंटचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सिड स्वामीनाथन म्हणाले, “संस्थात्मक तसेच किरकोळ गुंतवणूकदारांनी आमच्या पहिल्याच NFO ला मिळवून दिलेला जोरदार प्रतिसाद हा आमच्या गुंतवणूक तत्वज्ञान, जोखमीचे व्यवस्थापन आणि डिजिटल-फर्स्ट दृष्टीकोनावर विश्वास दाखवतो. भारतातील विकसित होत चाललेल्या गुंतवणूक क्षेत्रात प्रभावी भूमिका बजावण्यासाठी हा आमच्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे.”
कंपनीने किरकोळ गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी ‘अकाउंट क्रिएशन इनिशिएटिव्ह’ नावाचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट म्हणजे गुंतवणुकीसाठीचे ऑनबोर्डिंग प्रक्रियेस सुलभ करणे. यामध्ये ग्राहक ‘जिओ फायनान्स’ अॅपद्वारे केवळ काही मिनिटांत आपले गुंतवणूक खाते तयार करू शकतो.