विशेष प्रतिनिधी, मुंबई
मोबाईल ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या टेलिकॉम कंपन्या अनेक योजना आणत असतात. यात सध्याच्या काळात रिलायन्स जिओ आघाडीवर आहे. आता रिलायन्स जिओने आपल्या जिओ ब्रॉडबँड जिओच्या मोबाईल वापरकर्त्या ग्राहकांसाठी ६ नवीन योजना आणल्या आहे.
जिओ फायबरच्या या नवीन प्लॅनची सुरुवातीची स्वस्त किंमत २,०९७ रुपये आहे आणि सर्वात महाग प्लॅनची किंमत २५ हजार ५९७ रुपये आहे. जिओ फायबरच्या या सर्व योजना तीन महिन्यांच्या वैधतेसह येतात. याबाबत कंपनीने म्हटले आहे की, या योजनांचे कनेक्शन घेण्यासाठी इन्स्टॉलेशन शुल्क आकारले जाणार नाही. या योजनांसह 1Gbps पर्यंत स्पीड उपलब्ध असेल, जरी जिओने अधिकृतपणे या योजनांबद्दल कोणतेही विधान जारी केलेले नाही. नवीन योजना जिओच्या वेबसाइट आणि मायजियो अॅपवर पाहता येईल. या सर्व ६ योजनांबद्दल जाणून घेऊ या …
१ ) नवीन यादीतील सर्वात स्वस्त प्लॅन २,०९७ रुपयांचा आहे. यात 100Mbps स्पीड आणि अमर्यादित डेटासह तीन महिन्यांसाठी अमर्यादित कॉलिंगची सुविधा मिळेल. या प्लॅनमध्ये कोणतीही जादा सेवा किंवा ओटीटी अॅप्सची सदस्यता मिळणार नाही. तसेच कनेक्शनसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
२ ) जिओचा दुसरा प्लॅन २,९९७ रुपयांचा आहे. जिओ फायबरच्या या प्लॅनमध्ये 14 OTT अॅप्सचे सबस्क्रिप्शन मिळेल यात ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ, डिस्कवरी, डिस्ने, हॉट स्टार, इरोस नो आणि झी 5 यांचा समावेश आहे. या प्लॅनची वैधता देखील तीन महिन्यांची आहे आणि यात 150Mbps डाउनलोड आणि अपलोडिंग स्पीड मिळेल. यात अमर्यादित कॉलिंगची सुविधा देखील आहे.
३ ) कंपनीचा तिसरा प्लॅन ४,४९७ रुपयांचा आहे, यामध्ये अनेक ओटीटी अॅप्सचे सबस्क्रिप्शन उपलब्ध असेल. या व्यतिरिक्त, विशेषतः नेटफ्लिक्स बेसिकची सदस्यता देखील असेल. या प्लानमध्ये 300Mbps च्या डाउनलोड आणि अपलोड स्पीडसह सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग उपलब्ध असेल.
४ ) जिओ फायबरचा चौथा प्लॅन ७,४९७ रुपयांचा आहे, ज्यामध्ये 500Mbps ची स्पीड उपलब्ध असेल. या प्लॅनची वैधता देखील तीन महिन्यांची आहे आणि त्यात १५ ओटीटी अॅप्सची सबस्क्रिप्शन उपलब्ध असेल. या प्लॅनसह, सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग उपलब्ध असेल.
५ ) ग्राहकाला जास्त स्पीड हवी असेल तर जिओने ११,९९७ चा प्लान सादर केला आहे. या प्लॅनमध्ये 1Gbps ची स्पीड उपलब्ध असेल आणि त्यात अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही आहे. या योजनेसह, तुम्हाला AltBalaji, Netflix, ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ, डिस्कवरी, डिस्ने, हॉट स्टार, इरोस नो आणि झी ५ ची मोफत सदस्यता मिळेल.
६ ) त्याचप्रमाणे जिओ कंपनीकडून सर्वात महाग असलेला २५,४९७ रुपयांचा प्लॅन देखील लॉन्च करण्यात आला आहे, ज्यामध्ये १ जीबीपीएसच्या वेगाने ६,६०० जीबी डेटा उपलब्ध होईल.या प्लॅनमध्ये १५ ओटीटी अॅप्सची सदस्यता देखील उपलब्ध असेल.