पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मोबाईल ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी खासगी टेलिकॉम कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा दिसून येत आहे. त्यातच आता रिलायन्स जिओ दूरसंचार कंपनीने मोबाईल वापरकर्त्यांना कमी किमतीत उत्तम फायदे देणारे प्लॅन ऑफर केले आहे. जिओचे काही सर्वोत्तम प्लॅन हे 150 रुपयांच्या रेंजमध्ये आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा कमी किमतीच्या प्लॅनमध्येही कंपनी 20 GB पर्यंत डेटा आणि फ्री कॉलिंग सारखे फायदे देत आहे. त्यांचा तपशील जाणून घेऊ या…
149 रुपयांचा प्लॅन
जिओचा हा प्लान 30 दिवसांच्या वैधतेसह देण्यात येतो. या प्लॅनमध्ये कंपनी इंटरनेट वापरासाठी दररोज 1 GB डेटा देते. या प्लॅनमध्ये उपलब्ध एकूण डेटा 20 GB होईल. दररोज 100 मोफत एसएमएस देणार्या या प्लॅनमध्ये देशभरातील सर्व नेटवर्कसाठी अमर्यादित कॉलिंग देखील मिळेल. या प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या अतिरिक्त फायद्यांमध्ये Jio अॅप्सची मोफत सदस्यता समाविष्ट आहे.
155 रुपयांचा प्लॅन
कंपनीचा हा प्लान 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला इंटरनेट वापरण्यासाठी २ जीबी डेटा मिळेल. या प्लॅनचे सदस्य देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग करू शकतात. या प्लॅनमध्ये तुम्हाला 300 मोफत एसएमएससह जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन देखील मिळेल.
152 रुपयांचा प्लॅन
कंपनीचा हा प्लान जिओ फोन यूजर्ससाठी आहे. या प्लॅनमध्ये कंपनी 28 जिन्सची वैधता ऑफर करते. इंटरनेट वापरण्यासाठी, प्लॅनमध्ये दररोज 0.5 GB नुसार एकूण 14 GB डेटा उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये, संपूर्ण वैधता कालावधीसाठी 300 विनामूल्य एसएमएस आणि देशभरातील सर्व नेटवर्कवर विनामूल्य अमर्यादित कॉलिंग देखील मिळेल. कंपनीच्या या प्लॅनमध्ये Jio अॅप्सचाही मोफत प्रवेश मिळतो.