मंगळवार, जुलै 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

या शहरात जिओची 5G डाउनलोड आणि अपलोड स्पीड सर्वाधिक…. ट्रायचा अहवाल

by Gautam Sancheti
मे 20, 2025 | 1:55 pm
in इतर
0
Screenshot 20250520 135127 Google

नागपूर – टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) द्वारा मार्च 2025 मध्ये आयोजित स्वतंत्र ड्राइव्ह टेस्ट (IDT) नुसार, रिलायन्स जिओने नागपूर शहरात 5G डाउनलोड व अपलोड स्पीडच्या बाबतीत सर्व प्रतिस्पर्धी कंपन्यांना मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे. ट्रायच्या आकडेवारीनुसार, रिलायन्स जिओने नागपूरमध्ये सरासरी 255.22 Mbps डाउनलोड स्पीड प्रदान केला, जो सर्व टेलिकॉम ऑपरेटरांमध्ये सर्वोच्च आहे.

अपलोड स्पीडच्या बाबतीतही जिओने 33.24 Mbps स्पीडसह इतर स्पर्धक कंपन्यांपेक्षा दुप्पट कामगिरी केली आहे. जिओची नेटवर्क लेटंसी अत्यंत कमी आहे, जी व्हिडिओ कॉल, व्हर्च्युअल मिटिंग्ज व ऑनलाइन गेमिंगसारख्या रिअल-टाईम अ‍ॅप्लिकेशन्ससाठी अत्यंत उपयुक्त ठरते.

कॉल सेटअप यशस्वी दर, जलद कॉल कनेक्शन वेळ, नगण्य कॉल ड्रॉप्स आणि उच्च दर्जाची व्हॉईस स्पष्टता अशा सर्व बाबतीतही जिओने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

स्वतंत्र ड्राइव्ह टेस्ट नागपूरसह मुंबई, अंबाला, चेन्नई, श्रीनगर, प्रयागराज आणि इंदूर या शहरांमध्ये करण्यात आली होती. नागपूरमध्ये ही चाचणी 4 मार्च 2025 ते 7 मार्च 2025 दरम्यान, शहरातील सर्व प्रमुख भाग, निवासी क्षेत्रे, रहदारीने भरलेल्या रस्त्यांवर आणि पादचारी क्षेत्रांमध्ये घेण्यात आली होती. जिओच्या घनदाट व नीटनेटकी नेटवर्क संरचनेमुळे या सर्व क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी साकारली गेली.

बफर-रहित स्ट्रीमिंग, एचडी व्हॉईस कॉल्स आणि रिअल-टाईम डाउनलोड्ससाठी रिलायन्स जिओ ही नागपूरमधील मोबाईल वापरकर्त्यांची पहिली पसंती ठरत आहे. आपल्या भविष्याभिमुख पायाभूत सुविधांमुळे आणि ग्राहककेंद्रित नवकल्पनांमुळे जिओ केवळ भारताच्या डिजिटल महत्त्वाकांक्षांशी समांतर वाटचाल करत नाही, तर त्यांना पुढे नेण्याचे कार्यही करत आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्याच्या मंत्रीमंडळ बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण निर्णय…..

Next Post

ज्येष्ठ वैज्ञानिक, खगोल शास्त्रज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Untitled 39

ज्येष्ठ वैज्ञानिक, खगोल शास्त्रज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी मदतीसाठी संकोच करू नये, जाणून घ्या, बुधवार, २३ जुलैचे राशिभविष्य

जुलै 22, 2025
Novha Merrytime

सागरी शिक्षण क्षेत्रात मुक्त विद्यापीठाचा प्रवेश…या अकादमी सोबत सामंजस्य करार

जुलै 22, 2025
kanda onion

केंद्राच्या कांदा खरेदीला या तारखे पर्यंत मुदतवाढ मिळावी….मुख्यमंत्र्यांना किसान मोर्चाचे पत्र

जुलै 22, 2025
cbi

परीक्षा पेपरफुटी प्रकरण…आठ माजी रेल्वे कर्मचाऱ्यांना पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

जुलै 22, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

५ वर्षांसाठी २५ हजार कोटींची तरतूद…अशी आहे कृषीसमृद्ध योजना

जुलै 22, 2025
amit shah11

केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह या तारखेला राष्ट्रीय सहकार धोरण करणार जाहीर…

जुलै 22, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011