इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने मार्च २०२५ साठी जाहीर केलेल्या मासिक सदस्यता अहवालानुसार, जिओने पुन्हा एकदा दूरसंचार क्षेत्रातील आपली मजबूत पकड सिद्ध केली आहे. देशातील टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये जिओने केवळ सर्वाधिक नव्या ग्राहकांची भर घातली नाही, तर जवळपास प्रत्येक विभागात इतर कंपन्यांना कडवी टक्कर दिली आहे.
मार्च महिन्यात एकूण २९.३ लाख नव्या ग्राहकांनी मोबाइल सेवा घेण्यासाठी नोंदणी केली, त्यापैकी एकट्या जिओनेच तब्बल २१.७ लाख ग्राहक जोडले. हे एकूण नव्या सदस्यतेपैकी ७४% पेक्षा अधिक आहे, ज्यावरून स्पष्ट होते की जिओच सध्या दूरसंचार क्षेत्रातील वाढीचा मुख्य प्रेरक आहे. ही वाढ एअरटेलच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे – मग ती वायरलेस असो, वायरलाइन असो, सक्रिय ग्राहक असोत किंवा 5G एअर फायबर.
सक्रिय ग्राहक (VLR) यांच्याच्या संख्येमध्येही जिओ आघाडीवर आहे. मार्च २०२५ मध्ये एकूण सक्रिय ग्राहकांपैकी ८६% हून अधिक म्हणजेच ५०.३ लाख ग्राहक जिओच्या सेवेशी जोडले गेले. सर्वात वेगाने वाढणाऱ्या विभागांपैकी एक असलेल्या 5G फिक्स्ड वायरलेस अॅक्सेस (FWA) सेगमेंटमध्ये देखील जिओचे वर्चस्व कायम आहे. या श्रेणीत जिओचा बाजार हिस्सा ८२% पेक्षा अधिक आहे आणि मार्च २०२५ अखेर याचे एकूण ग्राहक ५५.७ लाखांवर पोहोचले आहेत. हे आकडे हे सिद्ध करतात की जिओ केवळ तंत्रज्ञानातच नव्हे, तर ग्राहकांशी जोडलेपण आणि विश्वासार्हतेच्या बाबतीतही अग्रस्थानी असल्याचा दावा जीओने केला आहे.