इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
रिलायन्स जिओने आपल्या सर्व प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत 5G डाउनलोड स्पीडमध्ये पुन्हा एकदा बाजी मारली आहे. ऊकला स्पीडटेस्ट इंटेलिजन्स डेटानुसार, रिलायन्स जिओचा सरासरी 5G डाउनलोड स्पीड 258.54 एमबीपीएस नोंदवला गेला , तर एअरटेल 205.1 एमबीपीएस स्पीडसह दुसऱ्या स्थानावर राहिली. ऊकला यांनी जुलै ते डिसेंबर 2024 दरम्यान देशभरातून हा डेटा गोळा केला.
5G सह सर्वात वेगवान मोबाइल नेटवर्कचा किताबही रिलायन्स जिओने जिंकला आहे. जिओ भारतातील सर्वात वेगवान मोबाइल स्पीड नेटवर्क असलेला ऑपरेटर म्हणून समोर आला आहे. जिओचा सरासरी डाउनलोड स्पीड 158.63 एमबीपीएस इतका होता , तर एअरटेलचा स्पीड जिओच्या तुलनेत दोन तृतीयांश म्हणजेच सुमारे 100.67 एमबीपीएस होता . वोडाफोन-आयडिया 21.6 एमबीपीएस स्पीडसह तिसऱ्या स्थानावर राहिला.
या कालावधीत, जिओने देशभरात सर्वाधिक 5G उपलब्धता नोंदवली, म्हणजेच जिओ नेटवर्कचा विस्तार सर्वाधिक होता. स्पीडटेस्ट इंटेलिजन्स डेटानुसार, जिओच्या 73.7% वापरकर्त्यांनी बहुतेक वेळा जिओचे 5G नेटवर्क वापरले. ही संख्या इतर कोणत्याही ऑपरेटरपेक्षा जास्त आहे. मोबाइल कव्हरेजच्या बाबतीत 65.66 च्या कव्हरेज स्कोअरसह जिओ प्रथम स्थानावर राहिला, तर 58.17 स्कोअरसह एअरटेल दुसऱ्या स्थानावर होता.
रिलायन्स जिओने सर्वात वेगवान मोबाइल नेटवर्क आणि उत्तम मोबाइल कव्हरेजमध्ये पहिला क्रमांक मिळवला असताना, एअरटेलने व्हिडिओ स्ट्रीमिंग अनुभव आणि 5G गेमिंगमध्ये आघाडी घेतली. एअरटेल 65.73 च्या व्हिडिओ स्ट्रीमिंग स्कोअरसह सर्वात पुढे राहिला. 5G गेमिंगमध्ये एअरटेल आणि रिलायन्स जिओमध्ये किरकोळ अंतर होते. ऊकला नुसार, एअरटेलचा गेम स्कोअर 80.17 तर रिलायन्स जिओचा 76.58 नोंदवला गेला.