इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी! जिओने आपल्या विद्यमान आणि नवीन ग्राहकांसाठी दिलेला विशेष क्रिकेट ऑफर १५ एप्रिल २०२५ पर्यंत वाढवला आहे. हा ऑफर आधी ३१ मार्चला संपणार होता. या ऑफरअंतर्गत, २९९ रुपये किंवा त्याहून अधिक प्लॅन असलेले नवीन जिओ सिम कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांना किंवा किमान २९९ रुपयांचा रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना जिओहॉटस्टारवर आयपीएल क्रिकेट सीझन मोफत पाहता येणार आहे.
या अनलिमिटेड क्रिकेट ऑफरमध्ये ग्राहकांना टीव्ही/मोबाईलवर ९० दिवसांसाठी मोफत जिओहॉटस्टार सबस्क्रिप्शन मिळेल आणि तेही 4K क्वालिटीमध्ये, ज्यामुळे ग्राहक आयपीएल क्रिकेट सीझनचा संपूर्ण आनंद घेऊ शकतील. जिओ हॉटस्टार पॅक २२ मार्च २०२५ पासून, म्हणजेच आयपीएल क्रिकेट सीझनच्या पहिल्या सामन्याच्या दिवसापासून ९० दिवसांसाठी वैध असेल.
त्याचबरोबर, जिओ घरगुती वापरासाठी जिओफायबर किंवा जिओएअरफायबरचे मोफत ट्रायल कनेक्शन देखील देणार आहे. अल्ट्रा-फास्ट इंटरनेटचे हे मोफत ट्रायल कनेक्शन ५० दिवसांसाठी उपलब्ध असेल. ग्राहकांना 4K मध्ये क्रिकेट पाहण्याचा उत्तम अनुभव मिळेल तसेच उत्कृष्ट होम एंटरटेनमेंटचाही लाभ घेता येईल.
जिओफायबर किंवा जिओएअरफायबरच्या मोफत ट्रायल कनेक्शनसोबत ग्राहकांना:
• 800+ टीव्ही चॅनेल्स
• 11+ OTT अॅप्स
• अनलिमिटेड वाय-फाय मिळेल.
ही ऑफर आता १५ एप्रिल २०२५ पर्यंत उपलब्ध असेल. ऑफरचा लाभ घेण्यासाठी विद्यमान जिओ सिम ग्राहकांनी किमान २९९ रुपयांचा रिचार्ज करणे आवश्यक आहे. नवीन जिओ सिम ग्राहकांनीही २९९ रुपये किंवा त्याहून अधिक प्लॅन असलेले नवीन जिओ सिम घ्यावे. जे ग्राहक आधीच रिचार्ज करून आहेत, ते १०० रुपयांचा अॅड-ऑन पॅक घेऊन ही ऑफर मिळवू शकतात.