गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

जिओने दाखल केले ४ हजारहून अधिक पेटंट, भारत सरकार कडून ‘राष्ट्रीय बौद्धिक संपदा पुरस्कार

by India Darpan
मार्च 27, 2025 | 8:13 pm
in संमिश्र वार्ता
0
IMG 20250327 WA0258

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
टेक्नोलॉजी कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड (जेपीएल) ला दोन प्रतिष्ठित बौद्धिक संपदा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. भारत सरकारने राष्ट्रीय बौद्धिक संपदा पुरस्कार देऊन कंपनीला गौरवले आहे. तसेच वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन (WIPO) ने तंत्रज्ञान आणि नवकल्पनांमध्ये अपूर्व उत्कृष्टतेसाठी जिओला ट्रॉफी प्रदान केली आहे. या गौरवसोहळ्यात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी कंपनीला सन्मानित केले.

गेल्या तीन वर्षांत जिओने 4 हजारहून अधिक पेटंट दाखल केले आहेत. हे पेटंट मुख्यतः दूरसंचार, डिजिटल तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या क्षेत्रांमध्ये आहेत. साध्या भाषेत सांगायचं झाल्यास, ही पेटंट 5G, 6G आणि AI तंत्रज्ञानाच्या विकासाशी संबंधित आहेत. याआधी या तंत्रज्ञानावर मुख्यतः परदेशी कंपन्यांचे वर्चस्व होते. मात्र, जिओच्या या मोठ्या प्रमाणातील पेटंट दाखल करण्याच्या यशामुळे आता भारतीय कंपनी जिओ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जागतिक नेतेपद मिळवत आहे.

जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड (जेपीएल) चे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री आयुष भटनागर यांनी जेपीएलसाठी पुरस्कार स्वीकारला. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले,
“हे पुरस्कार नवकल्पनांच्या प्रति आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहेत. आम्ही केवळ तंत्रज्ञानावर काम करत नाही आहोत, तर अशा क्षमता विकसित करत आहोत ज्या 5G, 6G आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राष्ट्रीय विकासात मोलाची भूमिका बजावतील आणि जागतिक स्पर्धेत भारताला अग्रस्थानी पोहोचवतील.”

भारत सरकार सध्या 6G व्हिजन साकार करण्यावर भर देत आहे, आणि या स्पर्धेत जिओ आघाडीवर असल्याचे स्पष्ट दिसते. कंपनीने आपल्या निवेदनात सांगितले की, जेपीएलची बौद्धिक संपदा रणनीती भारत सरकारच्या ‘विकसित भारत 2047’ या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. यामध्ये तांत्रिक नवकल्पना, डिजिटल परिवर्तन आणि स्वदेशी तंत्रज्ञान क्षमता विकसित करण्यावर भर दिला जातो, ज्यामुळे भारत एक आत्मनिर्भर आणि विकसित अर्थव्यवस्था म्हणून समोर येईल.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सौर कृषी वाहिनी योजनेमुळे कृषीपंपांना मिळणार दिवसा वीज….नाशिक जिल्हाधिकारी यांनी केली प्रकल्पाची पाहणी

Next Post

या व्यक्तींनी फार आटापिटा करू नये, जाणून घ्या, शुक्रवार, २८ मार्चचे राशिभविष्य

Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी फार आटापिटा करू नये, जाणून घ्या, शुक्रवार, २८ मार्चचे राशिभविष्य

ताज्या बातम्या

cbi

४५ लाखाचे बनावट बिल…वैद्यकीय अधिका-यासह ८ खाजगी मेडिकल दुकानांच्या मालकांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल, सीबीआयची मोठी कारवाई

जून 19, 2025
sepak takra action 00

नाशिकमध्ये या तारखेला सेपक टकरा जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणी…

जून 19, 2025
Untitled 58

इस्रायल विरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करण्याचे अमेरिकेचं आवाहन इराणने फेटाळले

जून 19, 2025
Untitled 57

पतीने बॉयफ्रेंडसोबत पत्नीला हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं, पत्नीने मारली १२ फूट उंच छतावरून उडी…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 19, 2025
संग्रहीत फोटो

राज्यात आता दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा…मंत्रालयात झाली बैठक

जून 19, 2025
Untitled 56

डसॉल्ट एव्हिएशनचा रिलायन्सशी करार; फाल्कन २००० जेटसची नागपुरात होणार निर्मिती

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011