विशेष प्रतिनिधी, मुंबई
टेलिकॉम कंपनी आपल्या मोबाईल ग्राहकांसाठी विविध प्रकारच्या योजना आणत असतात. सध्या सरकारी आणि खासगी कंपन्यांमध्ये विविध प्लॅन आणण्याची जणू काही स्पर्धा सुरू आहे. त्यात रिलायन्स जिओ कंपनी सध्या आघाडीवर दिसत आहे.
रिलायन्स जिओने मोबाईल ग्राहकांसाठी जगातील सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन आणण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु त्यापूर्वी 5 नवीन प्री-पेड प्लॅन सादर केले आहेत. रिलायन्स जिओच्या नवीन प्री-पेड प्लॅनची प्रारंभिक किंमत ४९९ रुपये आहे. जिओने हा प्लॅन खासकरून प्री-पेड प्लॅनच्या किंमतीत ओटीटी अॅप्सची सदस्यता घेणाऱ्या ग्राहकांसाठी आणला आहे. जिओचे हे ५ प्लॅन आज दि. १ सप्टेंबरपासून हे ग्राहकांसाठी उपलब्ध होतील. आता
जिओच्या या ५ योजनांबद्दल जाणून घेऊ या…
नवीन ४९९ रुपयांचा प्लॅन : जिओच्या या ४९९ रुपयांच्या नवीन प्लॅनसह, एक महिन्याची वैधता उपलब्ध होईल. यामध्ये दररोज ३ जीबी डेटा मिळणार आहे. याशिवाय, या प्लॅनसह सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग, मेसेजिंग आणि डिस्ने प्लस हॉटस्टार सबस्क्रिप्शन एक वर्षासाठी उपलब्ध असेल.
६६६ रुपयांचा प्लॅन : जिओच्या या योजनेला एक वर्षासाठी डिस्ने प्लस हॉटस्टारची सदस्यता देखील मिळेल. याची वैधता ५६ दिवसांची आहे तसेच यात दररोज 2 जीबी डेटा मिळेल. यामध्ये अमर्यादित कॉलिंग आणि मेसेजिंगची सुविधा आहे.
नवा ८८८ रुपयांचा प्लॅन : जिओच्या या योजनेला एक वर्षासाठी डिस्ने प्लॅन हॉटस्टारची सदस्यता देखील मिळेल. या प्लॅनची वैधता ८४ दिवसांची असून यात दररोज २ जीबी डेटा मिळेल. यामध्ये अमर्यादित कॉलिंग आणि मेसेजिंगची सुविधा आहे.
नवीन २,५९९ रुपयांचा प्लॅन : जिओच्या या प्लॅनची वैधता ३६५ दिवसांची असून यात दररोज २ जीबी डेटा मिळेल. यामध्ये सुद्धा डिस्ने प्लस हॉटस्टार सबस्क्रिप्शन एका वर्षासाठी उपलब्ध असेल. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि मेसेजिंगची सुविधा आहे.
नवा ५४९ रुपयांचा प्लॅन : जीओ कंपनीने ५४९ रुपयांचा प्लान देखील सादर केला आहे. यात डेटा अॅड ऑन प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये दररोज १.५ जीबी डेटा उपलब्ध असेल. त्याची वैधता ५६ दिवस आहे.