नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इगतपुरी तालुक्यातील मौजे मुंढेगाव शिवारात जिंदाल पॉलिफिल्म कंपनीत 1 जानेवारी 2023 रोजी विस्फोट होवून आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेदरम्यान कंपनीतील बेपत्ता कर्मचाऱ्यांच्या माहितीसाठी संपर्क क्रमांक कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती तालुका आपत्ती नियंत्रण अधिकारी तथा इगतपुरी तहसिलदार परमेश्वर कासुळे यांनी दिली आहे.
जिंदाल पॉलिफिल्म कंपनीत ज्या ठिकाणी आग लागल्याची दुर्घटना घडली आहे त्याभागातून बचाव पथकामार्फत अडकलेल्या एकूण 19 व्यक्तींना बाहेर काढण्यात आले असून त्यांना उपाचारार्थ नाशिक येथील सुयश हॉस्पिटल व ट्रोमा केअर सेंटर येथे दाखल करण्यात आले आहे. तसेच जखमींपैकी 2 महिलांचा मृत्यू झाला असून प्रकृती गंभीर असलेल्या 4 रूग्णांवर रूग्णालयामार्फत उपचार सुरू आहेत.
दुर्घटनेदरम्यान कंपनीत उपस्थित असलेल्या परंतु अद्यापही संपर्क न झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांनी संबंधित बेपत्ता झालेल्या कर्मचाऱ्याच्या तपशिलासह इगतपुरी तहसिल कार्यालय 02553-2440009 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही तहसिलदार श्री.कासुळे यांनी कळविले आहे.
संपर्कासाठी कार्यान्वित करण्यात आलेले भ्रमणध्वनी क्रमांक
▪️ इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण : 8108851212
▪️ इगतपुरी तहसिलदार परमेश्वर कासुळे : 9604075535
▪️ निवासी नायब तहसिलदार प्रविण गोंडाळे : 9850440760
▪️ महसुल सहायक नितिन केंगले : 9767900769
Jindal Company Fire Accident Many Employees Missing
Nashik Ploy films Industry Safety Blast