नाशिक – शेतकऱ्यांना बाजार समितीमध्ये येताना दर ८ दिवसांनी rtpcr टेस्ट करावी लागणार आहे. अशी खोडसाळ माहिती काही मंडळी पसरवत आहेत. अधिकृत अधिसूचनेत अशी कोणतीही अट घालण्यात आलेली नसल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी स्पष्ट केेले आहे. त्यांनी याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीने घ्यावयाची काळजी याबाबतची अधिकृत अधिसूचनेतील माहिती पाठवली आहे.