बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक जिल्हास्तरीय खरीप हंगाम नियोजन बैठक संपन्न…कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिले हे निर्देश

by India Darpan
मे 19, 2025 | 3:33 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20250519 WA0274

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– आगामी खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बि- बियाणे, खते, कीटकनाशकांसह विविध सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. राष्ट्रीयकृत बँकांनी अधिकाधिक शेतकऱ्यांना पतपुरवठा करावा. खतांचे लिकिंग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशा सूचना कृषी मंत्री ॲड माणिकराव कोकाटे यांनी आज येथे दिल्या

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आज सकाळी जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, आमदार दिलीप बनकर, आमदार हिरामण खोसकर, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, विभागीय कृषी सहसंचालक श्री. काटकर, प्राचार्य रामेती श्री. आमले, स्मार्ट नोडल अधिकारी श्री. वानखेडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अभिमन्यू काशीद, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कृषी विभागाने तयार केलेल्या कृषी विभागाच्या योजनांची माहिती व घडीपत्रिकेसह कृषी विभागाच्या व्हॉटस ॲप चॅनेलचे आणि संकेतस्थळाचे उदघाटन करण्यात आले. तसेच आरसीएफतर्फे विक्रेत्यांना पॉस मशीनचे वितरण करण्यात आले.

मंत्री ॲड. कोकाटे म्हणाले की, हवामान विभागाने यंदाचा पावसाळा समाधानकारक राहील, असा अंदाज वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्याची तक्रार येणार नाही, अशी दक्षता घ्यावी. पणन विभागाने सुविधा केंद्रांचे तातडीने अद्ययावतीकरण करावे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कर्ज वितरण करावे. त्यासाठी अग्रणी बँक व सहकार विभागाने, तर शेततळेधारक शेतकऱ्यांना सौर कृषी पंप मिळण्यासाठी वीज कंपनीने पाठपुरावा करावा. जिल्ह्यात रेशीम लागवडीचे क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून प्रारुप आराखडा करावा. त्याबरोबरच रेशीम लागवडीसाठी व्यापक प्रमाणात जनजागृती मोहीम राबवावी, असेही त्यांनी सांगितले. आमदार श्री. खोसकर यांनी सांगितले की, कृषी विभागाने दुर्गम, आदिवासी भागात आंबा लागवड, रेशीम शेतीविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. खासदार श्री. वाजे, आमदार श्री. बनकर यांनीही सूचना केल्या.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. काशीद यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी सांगितले की, जिल्ह्यात ६ लाख 44 हजार हेक्टर क्षेत्रात विविध पिकांचा पेरा होणार आहे. त्यासाठी बि- बियाणे, रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्याबरोबरच आपत्कालिन पीक नियोजन आराखडा तयार करण्यात आला आहे. बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करताना घ्यावयाची काळजी याविषयी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. जिल्ह्यात विभागस्तरावर दोन, जिल्हास्तरावर ६, उपविभागस्तरावर ८ व तालुकास्तरावर ३० गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक कार्यरत आहेत, असेही त्यांनी सांगितले. यावेळी कृषी विभागाचे वरीष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

घरफोडीत चोरट्यांनी रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे केले लंपास….जयभवानी रोडवरील घटना

Next Post

अमित ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना पाठवलेल्या पत्रावर मंत्री गिरीश महाजन यांनी दिली ही प्रतिक्रिया

Next Post
girish mahanjan e1704470311994

अमित ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना पाठवलेल्या पत्रावर मंत्री गिरीश महाजन यांनी दिली ही प्रतिक्रिया

ताज्या बातम्या

Untitled 50

पुणे, चंद्रपूर, नंदुरबारसह या जिल्ह्यातील माजी नगरसेवकांसह पदाधिका-यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश…

जून 18, 2025
cricket

या स्पर्धेत नाशिकच्या ईश्वरी सावकारला उत्कृष्ट फलंदाजीची ऑरेंज कॅप तर गोलंदाजीत प्रियंका घोडकेचीही चमक

जून 18, 2025
image003Y64Y

भारताच्या सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल मल्टी-मोडल कार्गो टर्मिनलचे उद्घाटन…इतकी आहे लोडिंग क्षमता

जून 18, 2025
mantralya mudra

राज्यात सुमारे साडे अकरा लाख हेक्टरवर पेरण्या…मंत्रिमंडळ बैठकीत आढावा

जून 18, 2025
crime1

पेस्टीसाईड दुकान फोडून चोरट्यांनी दोन लाखांच्या औषधांवर मारला डल्ला

जून 18, 2025
IMG 20250617 WA0334 1

कुंभमेळा प्राधिकरणाची पहिली बैठक संपन्न…अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी केल्या या सूचना

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011