नाशिक – महसूल विभागात क्षेत्रिय स्तरावर उत्कृष्ट काम करणारे अधिकारी, कर्मचारी यांची निवड करुन, त्यांचा गौरव सन्मान जिल्हा स्तरावर करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिल्यानंतर जिल्हयात १३ अधिकारी उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी यांची निवड करण्यात आली आहे. त्यात उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार, अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, लिपीक, तलाठी, पोलिस पाटील, कोतवाल, वाहन चालक, शिपाई, लघुलेखक यांचा समावेश आहे. या सर्वांचा सन्मान २ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता व्हिडिओ कॅान्फन्सिंगच्या माध्यमातून घेतला जाणार आहे. या सर्व अधिका-यांचे व कर्मचा-यांचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे हे सन्मान करणार आहे. या सर्व उत्कृष्ट काम करणारे अधिकारी, कर्मचारी यांचे नाशिक जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेतर्फे अध्यक्ष दिनेश वाघ यांनी अभिनंदन केले आहे.
नाशिक जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेतर्फे या
उत्कृष्ट काम करणारे अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन