नाशिक – जिल्ह्यात लॅाकडाऊनच्या निर्बंधामध्ये कोणताही बदल केला नसला तरी जिल्ह्यात सुरु झालेले मॅाल येत्या सोमवारपासून पुन्हा बंद होणार आहे. तर शनिवार व रविवारी लग्न सोहळ्याला दिलेली परवाणगी रद्द करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनातर्फे ही माहिती देण्यात आली आहे.
जिल्ह्यात अनलॅाकझाल्यानंतर जे निर्बंध घातले होते. त्यात शिथीलता करत लग्नसोहळ्याला शनिवार व रविवारी परवाणगी देण्यात आली होती. त्याचप्रमाणे मॅाल्सचही सुरु करण्यात आले होते. पण, आता पुन्हा तिस-या लाटेमुळे दिलेल्या या परवानग्या रद्द करण्यात आल्या आहे.
शुक्रवारी राज्यातील कोरोना प्रादुर्भावाची दखल घेत राज्य सरकारने कोरोना निर्बंधांबाबत विशेष आदेश काढले आहेत. यापूर्वी पाच टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले होते. मात्र, कोरोनाचा नवा अवतार डेल्टा आणि संभाव्य तिसरी लाट याची दखल घेत राज्य सरकारने आता सर्व जिल्हे तिसऱ्या टप्प्यात टाकली आहेत. त्यामुळे कोरोनाचे निर्बंध शिथील होणार नाहीत. तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध संपूर्ण राज्यात लागू असतील. राज्य सरकारच्या या आदेशानंतर नाशिक शहरासह जिल्ह्यात कुठले निर्बंध असतील, हे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कालच स्पष्ट केले आहे. त्यात त्यांनी सांगितले की, ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत शासनाने आज नव्याने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तथापि, जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये व सवलतींमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.. पण, शनिवारी या दोन सवलती रद्द करण्यात आल्या आहे.