नाशिक – जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये २५ डिसेंबर हा दिवस अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म दिवस सुशासन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनातील उपयुक्त बाबीं संदर्भात उपक्रम राबविण्यात आला. त्यात बागलाणचे उपविभागीय अधिकारी बबन काकडे यांनी सेवा हमी योजने अंतर्गत देण्यात येणाऱ्या सेवाची अंमलबजावणी, माहितीचा अधिकार, तणाव मुक्ती व्यवस्थापन याबाबत माहिती दिली. याप्रसंगी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी प्रशासनातील कार्यपद्धतीत सुस्पष्टता, पारदर्शकता आणि जलद गतीने होण्यासाठी मार्गदर्शन केले. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी निलेश श्रींगी, नितीन गांवडे, भिमराज दराडे, अरविंद नरसीकर सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.