नशिक – काल मुंबईत एकाच दिवसात ८०६३ नवीन कोविड रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ८९ टक्के पूर्णपणे लक्षणे नसलेले आढळले आहेत. मुंबईत एकूण सक्रिय रुग्णांची संख्या आता ३००००+ आहे. नवीन रुग्णांपैकी ५०३ रूग्णालयात दाखल झाले आहेत. ५६ रुग्णांना ऑक्सिजन बेडवर ठेवण्यात आले आहे. नव्या वरियांटचा प्रसार समजण्यासाठी हे चित्र बोलके आहे. सर्व नागरिकांना आवाहन आहे की, कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य असून नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. लसीचे कवच प्राप्त करून घेणे अत्यावश्यक आहे. आता वेळ कमी आहे. कोविड महामारीच्या या नव्या लाटेवर मात करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे अतिशय आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.