नाशिक – जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचा कोरोना अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे. मांढरे यांनी गेल्या दोन दिवसापासून विविध बैठकांना उपस्थिती होते. गुरुवारी ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर आढावा बैठकीत उपस्थितीत होते. तर शुक्रवारी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या बरोबर स्मार्ट सिटीच्या बैठकीला त्यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्यांना आता कोरोना टेस्ट करावी लागणार आहे.
मांढरे यांनी कोरोना काळात अंत्यत धडाडीने काम केले. मालेगावमध्ये त्यांनी केलेल्या कामांचे सर्वत्र कौतुक झाले. जिल्ह्याच्या पहिल्या लाटेत त्यांची कामगिरी सर्वात चांगली होती. दुस-या लाटेतही त्यांनी कसोशीने प्रयत्न केले. जिल्हयाचा कोरोनाचा आकडा वाढल्यानंतर त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यशही आले. आता कोरोना कुठे आटोक्यात येत असतांनाच त्यांचा अहवाल पॅाझिटिव्ह आला.