नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे गौरव कार्यक्रम
दिंडोरी : विविध मूलभूत प्रश्न सोडविण्याची ताकद पत्रकारितेत आहेत. विकास कामे होण्यामागे पत्रकारांचे देखील मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन विधानसभेचे उपसभापती ना. नरहरी झिरवाळ यांनी केले.
नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ नाशिकचा पत्रकार दिनी जीवनगौरव व जिल्हास्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार गौरव सोहळा गुरुवारी महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष ना. झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली मालेगाव येथील ऐश्वर्या कॅान्फरन्स हॅाल येथे उत्साहात पार पडला. यावेळी व्यापीठावर आ.मौलाना मुफ्ती मोहंमद ईस्माईल, उपमहापौर निलेश आहेर ,मामको बॅंकेचे चेअरमन,युवा नेते राजेंद्र भोसले,जिल्हा पत्रकार संघाचे संस्थापक-जिल्हाध्यक्ष यशवंत पवार, राष्ट्रवादीचे नेते विनोद चव्हाण,नगरसेवक भिमा भडांगे भाजपचे देवा पाटील, कृउबा सचिव अशोक देसले व प्रकाश अहिरे आदींसह सर्व पक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.
ना. झिरवाळ पुढे म्हणाले की, शहरासह ग्रामीण, आदिवासी भागातील अनेक समस्या पत्रकार निदर्शनास आणून देतात. त्यामुळे लोकप्रतिनिधी देखील जागरुक राहतो. आज मंदीर, सभागृहा बरोबरच अभ्यासिकांची देखील गरज आहे. आज पत्रकारांनी देखील काळाच्या बदलत्या प्रवाहात आपल्यात बदल करून घ्यावा, असे आवाहनही ना. झिरवाळ यांनी केले. यावेळी राजेन्द्र भोसले यांनी पत्रकारितेचे कॉर्पोरेट शिरलेत, नियमात बदल होत आहेत. डिजिटल युगाकडे वाटचाल सुरु झाली असून, पत्रकारांची देखिल त्यादृष्टीने वाटचाल सुरु आहेत. यावेळी प्रास्ताविकात संघाचे संस्थापक जिल्हाध्यक्ष यशवंत पवार यांनी संघाच्या कार्याची माहिती दिली. कोरोना निर्बंध असल्याने गेल्या वर्षी कार्यक्रम घेता आला नाही. तसेच या वर्षी देखील निर्बंध वाढल्याने कार्यक्रम मालेगावात घेतल्याचे सांगीतले. यावेळी आ.मौलाना मुफ्ती मोहंमद.ईस्माईल यांनी देश विकासात चौथा पत्रकरिता स्तंभ महत्वाची भूमिका बजावतोय. परंतू सत्यता पडताळून बातमी द्यावी, असे आवाहन केले. यावेळी ना.झिरवाळ यांच्या हस्ते यशवंत पवार यांचा वाढदिवसानिमित्त ना.झिरवाळ व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गांवकरीचे दिवंगत स्व.कल्याणराव आवटे यांच्या परिवाराने जीवन गौरव पुरस्कार स्विकारला. तसेच सुभाष शहा यांनाही जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रारंभी जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब बोरगुडे यांनी स्वागत केले तर चेतन महाजन यांनी आभार मानले.
या प्रसंगी जिल्हा पदाधिकारी जेष्ठ पत्रकार नाना महाजन, विनायक माळी मालेगाव तालुका मराठी पत्रकार संघांचे तालुका अध्यक्ष चेतन महाजन, कार्याध्यक्ष मनोहर शेवाळे, सरचिटणीस विशाल गोसावी, खजिनदार राजेश सूर्यवंशी, दिंडोरी तालुका अध्यक्ष भगवान गायकवाड ,हरीश मारू, राजेश धनवट, योगेश पगार, समाधान शेवाळे, महेंद्र पगार, राहुल पवार, बलराम चौधरी, प्रमोद बोरसे, राजीव वडगे,समीर दोषी यांच्यासह जिल्हाभरांतील पत्रकार उपस्थित होते.