नाशिक – नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकबाकीपोटी २४० वाहन व ट्रक्टर जप्त केले आहेत. या वाहनांपैकी काही वाहनांचा लिलावर झाला असून आता उर्वरीत ९१ वाहन ट्रॅक्टरांचा लिलाव होणार आहे. या ९१ पैकी कळवण येथे २३ व २४ मार्च रोजी कळवण येथे ६० ट्रॅक्टरांचा तर ३१ ट्रॅक्टरांचा २५ मार्चला त्रंबक येथे होणार आहे. या सर्व वाहनांची शासन मान्यता प्राप्त मुल्यांकनकार यांच्याकडून मूल्यांकन प्राप्त आहे.
बँकेचा २०२१-२०२२ कर्ज वसुली हंगाम सुरु असल्याने बँकेची २००० कोटीची रक्कम वसुलीस पात्र असून त्यापैकी १४५२ कोटीची जुनी थकबाकी आहे. चालू वसुली हंगामात जास्तीत जास्त थकीत कर्ज वसुली करण्याचा बँकेचा प्रयत्न आहे. बँकेच्या खातेदारांना ठेवींची, खात्यावरील त्यांची बचतीची रक्कम उपलब्धत होण्यासाठी बँकेचे प्रशासक यांनी वसुलीबाबत आढावा बैठक घेतली आहे. या बैठीकत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचे नियम १९६१ चे नियम १०१ नुसार कारवाई करून मोठे व प्रभावशाली असलेले तसेच हेतुपुरस्कर कर्ज परतफेड न करणारे थकबाकीदारांवर थकबाकीची कर्ज वसुलीसाठी कार्यवाही सुरु करण्यास सक्त आदेश दिले आहे. त्यानुसार बँकेने जिल्ह्यातील व तालुक्यातील मोठे व प्रभावशाली असलेले तसेच हेतुपुरस्कर कर्ज परतफेड न करणारे वारंवार थकीत कर्ज भरण्यासाठी सहकारी संस्था अधीनियम १९६० अन्वये योग्य त्या कर्ज मागणी नोटीसा देऊनही व वारंवार सौजन्याने तगादे करूनही थकीत कर्ज रक्कमेचा बँकेकडे भरणा केला नाही अशा २०१६ पूर्वीच्या मोठे व प्रभावशाली असलेले तसेच हेतुपुरस्कर कर्ज परतफेड न करणारे थकबाकीदार सभासदांच्या तालुकानिहाय याद्या तयार करून अशा थकबाकीदार सभासदांचे बँकेस प्राप्त महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचे नियम १९६१ चे नियम १०१नुसार थकीत कर्ज रकमेसाठी वसुलीची कार्यवाही सुरु केली असल्याची माहिती बँकेने दिली आहे.