मुंबई – सहकार विभागाने कोरोनामुळे ३१ ऑगस्टपर्यंत राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित केल्या होत्या. ही मुदत संपण्याअगोदरच आता राज्यातील जिल्हा बँकांची निवडणूक प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत. कोरोनामुळे राज्यातील ३१ पैकी १३ जिल्हा बँकांच्या निवडणुका रखडल्या आहेत. त्यामुळे या निवडणुका पुढील काळात आता घेण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाने हे परिपत्रक काढले आहे.