मुंबई – सह्याद्री अतिथीगृहात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे त्यांच्या विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेत असतांना त्यावेळी बाहरेच्या ठिकाणी शोभेचे मोठे झुंबर बरोबरच पीओपी स्लॅपही कोसळला. त्यामुळे काही काळ येथे सर्वांचाच गोंधळ उडाला. अचानक झालेल्या या घटनेमुळे सर्वांची धावाधावही झाली. या दुर्घटनेत कोणी जखमी झाले नसले तरी ही दुर्घटना मोठी होती. शुक्रवारी सायंकाळी ही घटना झाल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. हा अपघात होता की यामागे दुसरे काही कारण होते याचा शोध आता घेतला जात आहे. या घटनेनंतर सर्वच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहे.शनिवारी पर्यटन दिन असल्यामुळे ही बैठक असल्याचे बोलले जात आहे. त्यातच ही घटना घडली.