इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – असे म्हणतात की, कायदे हे नेहमी महिलांच्या बाजूने असतात, त्यामुळे महिलांना न्याय मिळतो. परंतु काही वेळा पुरुषांवर अन्याय होतो, असे म्हटले जाते. अलीकडच्या काळात संपूर्ण देशात बलात्काराच्या अनेक घटना घडत आहेत. त्या वास्तवात खऱ्या असू शकतात, परंतु काही वेळा बलात्काराचा खोटा आरोप करून महिला पुरुषांना ब्लॅकमेल देखील करतात, काही महिला तर आपल्या पति वर किंवा रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या पुरुषावर बलात्काराचा आरोप करीत त्यांच्यावर गुन्हे दाखल करतात, त्यामुळे त्या पुरुषांना शिक्षाही होते, परंतु एका प्रकरणांमध्ये तथा केसमध्ये महिलेचे हे आरोप फेटाळून लावण्यात आले आहेत, झारखंड मधील ही घटना असून यापूर्वी अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत.
कोर्ट म्हणाले…
यापूर्वी एका बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या महिलेला अलाहबाद न्यायालयाने १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या महिलेने चार पुरुषांच्या विरोधात बलात्कार व शरीर संबंध बळजबरीने प्रस्थापित केल्याचा खोटा आरोप लावला होता. दरम्यान, आता झारखंड हायकोर्टाने एका विवाहित महिलेची याचिका फेटाळत मोठा निर्णय दिला आहे. जर शारीरिक संबंधानंतर होणाऱ्या परिणामाची महिलेला जाणीव होती. तर मग तिने त्याला संबंधी दिलीच कशी ? आरोपीने कोणत्याही प्रकारचे खोटे आश्वासन देऊन शारीरिक संबंध ठेवले असे म्हणता येणार नाही, असेही झारखंड हायकोर्टाचे न्यायाधीश सुभाष चंद यांनी निकाल देताना स्पष्टपणे म्हटले आहे. कथित लग्नाचे आश्वासन देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे महिलेचे आरोप कोर्टाने फेटाळले आहे. दरम्यान, सत्र न्यायालयाने घेतलेल्या निर्णयाला झारखंड हायकोर्टात आव्हान देण्यात आले होते या प्रकरणावर निकाल देताना झारखंड हायकोर्टाने महिलेच्या बलात्काराच्या आरोपाची याचिका फेटाळली.
महिलेचे दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न
खरे तर प्रकरणात याचिकाकर्त्या महिलेने आरोप केला होता की, आरोपीने आमिष देऊन नातेसंबंध तयार करून महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते, तसेच या दोघांमधील नाते पालकांसमोर जाहीर करू नये, असेही सांगितले होते. त्यानंतर तो इसम शिक्षणासाठी दुसरीकडे गेल्याचे महिलेने म्हटले आहे. आरोपीने सोडून गेल्यानंतर आरोप करणाऱ्या महिलेने दुसऱ्या एका व्यक्तीसोबत लग्न केले होते, तसेच लग्न केल्याचे माहिती असतानाही आरोपी महिलेच्या संपर्कात होता. तसेच त्याच्याकडून त्रास देणे सुरू असल्याचे महिलेने आरोपात म्हटले आहे. आरोपीने लग्नाचे वचन दिले होते. यामुळे मी माझ्या पतीला सन २०१९ घटस्फोट दिला, असे त्या महिलेचे म्हणणे आहे. मात्र सन२०१८ मध्ये लग्न करताना पीडित महिलाही १८ वर्षापेक्षा जास्त वयाची म्हणजे सज्ञान होती. त्यामुळे असे असताना देखील आरोपी अभिषेकच्या लग्नाच्या आमिषाला बळी पडून शारिरीक संबंध प्रस्थापित केले, असे खालच्या कोर्टात निकाल देताना म्हटले आहे. मात्र पीडित महिला सज्ञान आणि विवाहित होती. परपुरूषाशी संबंध ठेवण्याचे परिणामाची जाणीव होती. यामुळे आरोपीने खोटे आश्वासन देऊन शारीरिक संबंधासाठी सहमती मिळवली नसल्याचे दिसून येत आहे, असे झारखंड हायकोर्टाच्या घटनापीठाने म्हटले आहे. एक प्रकारे खोट्या गुन्ह्यात अडकलेल्या पुरुषांना हा दिलासा म्हणावा लागेल.
Jharkhand High Court Reject Petition Rape Women Crime