इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – झारखंड मधील धनबाद येथे शिक्षक दिनी महाविद्यालयातील प्राध्यापकाने विद्यार्थींनीकडे प्यार की मिठाई मागितली. या प्रकारामुळे शिक्षक दिनाला गालबोट लागले. या घटनेनंतर बजरंग दलाने कॉलेजमध्ये गोंधळ घातला. दरम्यान, विद्यार्थीनीने केलेले आरोप निराधार असल्याचे प्राध्यापकाने म्हटले आहे.
बीएमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनीला कॉलेजमध्येच प्राध्यापकाने मिठाई मागितली. ती देण्यास तिने होकार दिला. तसेच कोणती मिठाई पाहिजे असे विचारले. त्यावेळी प्राध्यापक म्हणाला की, बाजारात मिळणारी मिठाई तर मी खरेदी करु शकतो. त्यामुळे विद्यार्थिनीने विचारले की, कोणती मिठाई पाहिजे. त्यावर प्राध्यापक म्हणाला की, प्यार वाली मिठाई. या घटनेनंतर विद्यार्थिनीने घरी जाऊन सर्व प्रकार पालकांना सांगितला.
पालकांनी बजरंग दल कार्यकर्त्यांना ही बाब सांगितली. त्यानंतर बजरंग दलाने महाविद्यालयात जोरदार गोंधळ घातला. प्राचार्य डॉ. के. के. पाठक यांना भेटून हा प्रकार सांगितला. त्यांनी महिला सेलकडून प्रकरणाची चौकशी करण्यात येईल असे सांगितले. या चौकशीनंतर कडक कारवाईचे आश्वासन दिले. दरम्यान प्रो. सुरेंद्र यादव याने सुद्धा पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचे सांगितले. तर विद्यार्थिनीने सुध्दा पोलिस स्टेशन गाठले आहे. आता या प्रकरणाची पोलिसही चौकशी करत आहेत.
On teacher’s day, professor asked students for sweets, then this happened….
Jharkhand Dhanbad Crime College Professor Girl Student Obscene Remark