इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – झारखंडमधील काँग्रेसच्या तीन आमदारांना मोठ्या रकमेसह पश्चिम बंगालमध्ये पकडण्यात आले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आमदारांकडे मिळालेली रक्कम एवढी आहे की मशीनशिवाय मोजता येणार नाही. जप्त केलेले पैसे मोजण्यासाठी ती मोजणी यंत्राची वाट पाहत असल्याचे पोलिसांनी सांगितले. हावडाच्या पोलिस अधिक्षक स्वाती भंगालिया यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या तिघा आमदारांमध्ये इरफान अन्सारी (जमतारा), राजेश कछाप आणि नमन बिक्सल (कोलेबीरा) यांचा समावेश आहे.
एवढी मोठी रोकड जप्त झाल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. झारखंड भाजपचे सरचिटणीस म्हणाले की, झारखंडमध्ये काँग्रेसची सत्ता आल्यापासून भ्रष्टाचार सातत्याने वाढत आहे. ते म्हणाले की, यापूर्वी झारखंडमधील अधिकाऱ्यांच्या घरातूनही रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. साहू म्हणाले की, हे लोक जनतेच्या कष्टाच्या पैशाचा दुरुपयोग करतात.
दरम्यान, नोटांची मोजणी सध्या सुरू झाली आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत. तर तिन्ही आमदारांची कसून चौकशी करण्यात येत आहे.
https://twitter.com/ANI/status/1553406994060824576?s=20&t=tpNgmZAVwshj9bNPeHORhQ
झारखंडच्या काँग्रेस आमदारांना रोख रकमेसह पकडल्यानंतर तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) ट्विट केले आहे. हे अत्यंत धक्कादायक असल्याचे ट्विटमध्ये म्हटले आहे. हावडा येथे झारखंडमधील काँग्रेस आमदारांच्या कारमधून मोठी रोकड जप्त करण्यात आली आहे. ईडी काही निवडक लोकांविरुद्धच सक्रिय आहे का? आजकाल बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केल्यामुळे सतत चर्चेत असते. पश्चिम बंगालचे माजी मंत्री पार्थ चॅटर्जी यांची जवळची सहकारी अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून ईडीने सुमारे ५० कोटींची रोकड जप्त केली आहे. शिक्षक भरती घोटाळ्यात ही कारवाई झाली आहे.
Jharkhand Congress MLA Arrested Bulk of Notes West Bengal