इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – महाराष्ट्र प्रमाणेच आता झारखंडमध्येही सत्ता संघर्ष तथा राजकारण सुरू असल्याचे बोलले जात आहे. इतर पक्षातील आमदारांना फोडून आपले सरकार स्थापन करण्याचा सपाटा भाजपने लावला आहे. महाराष्ट्रात मागच्या महिन्यात शिवसेना पक्षातील आमदार फोडून महाराष्ट्रात सत्ता स्थापण केली. तोच प्रकार इतर राज्यात करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचे अनेक राष्ट्रीय नेते बोलून दाखवत आहे. त्यामुळे येत्या काळात अनेक राज्यात भाजपाची सत्ता असेल. झारखंडच्या सोरेन सरकारने एक वादग्रस्त वक्तव्य केल्याने केंद्र सरकारमध्ये खळबळ उडाली आहे.
‘शत प्रतिशत भाजपमय भारत ‘ आणि ‘ऑपरेशन लोटस ‘ यासारख्या घोषणा करीत भाजपने केंद्रात कायमस्वरूपी सत्ता टिकून ठेवण्याबरोबरच देशभरातील सर्वच प्रांतात भारतीय जनता पक्षाचे सरकार असावे, असा जणूच काही चंगच बांधला आहे. त्यामुळेच विरोधकांचे सरकार असलेल्या राज्यात कारवाई करीत फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे, असा भाजप विरोधकांकडून वारंवार आरोप करण्यात येतो आणि त्याप्रमाणे तसेच चित्रही दिसत असल्याचे सांगण्यात येते.
झारखंड, छत्तीसगड, पश्चिम बंगालमध्ये ऑपरेशन लोटस होईल, असं एका भाजप नेत्यानं काही दिवसांपूर्वी म्हटलं होते. मात्र, झारखंड मुक्ती मोर्चाचे सरचिटणीस सुप्रियो भट्टाचार्य यांनी भाजपला धक्का देणारे वक्तव्य केले. झारखंडमधील भाजपचे 16 आमदार आमच्या संपर्कात असून ते हेमंत सोरेन सरकारला पाठिंबा देतील, असं वक्तव्य भट्टाचार्य यांनी केले आहे.
भट्टाचार्यांच्या वक्तव्यामुळं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. सुप्रियो भट्टाचार्य यांनी राज्यातील भाजपचे अनेक आमदार अस्वस्थ आहेत, त्यामुळं ते झारखंड मुक्ती मोर्चाला पाठिंबा देऊ शकतात. सुप्रियो यांच्या मते भाजपचे 16 आमदार वेगळा गट स्थापन करुन सोरेन सरकारला पाठिंबा देऊ शकतात. झारखंडमध्ये भाजपचे 26 आमदार आहेत. मात्र, भाजप प्रवक्ते प्रतुल शाहदेव यांनी सुप्रियो भट्टाचार्य यांचा दावा फेटाळून लावलाय. हेमंत सोरेन यांचा पक्ष त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी लढत आहे. खोट्या गोष्टी सांगून सरकार वाचवण्याचा प्रयत्न केला जातो असे, असे शाहदेव यांनी म्हटले आहे.
विशेष म्हणजे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवरती ज्या पद्धतीने ईडीच्या धाडी पडल्या त्याप्रमाणे झारखंड मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या जवळच्या व्यक्तींवरती देखील ईडीच्या धाडी पडल्या आहेत. पंकज मित्रा हे मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय मानले जातात. यांना ईडीने अटक केली असून त्यांच्याकडील 36 कोटी रुपये जप्त केले आहेत. मुळात झारखंडमधील कॉंग्रेसचे सरकार धोक्यात आले आहे.
तर दुसरीकडे भाजपच्या प्रवक्तांनी सोरेन यांचा दावा फेटाळून लावला आहे.
तिथले अनेक आमदार भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकले आहेत. हेमंत सोरेन यांचा पक्ष त्यांचं अस्तित्व ठिकवण्यासाठी ती लढत आहे.तसेच खोट्या गोष्टी सांगून पक्ष वाचवण्याचा त्याचा प्रयत्न आहे. येत्या काळात तिथंही राजकीय मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे. झारखंडमध्ये ईडीने गेल्या दोन महिन्यांमध्ये मोठ्या कारवाया केल्या आहेत. अवैध उत्खनन प्रकरणी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे प्रतिनिधी पंकज मिश्रा यांना ईडीनं अटक केली आहे. ईडीनं या प्रकरणी ३६ कोटी रुपये जप्त केले आहेत. याशिवाय भाजपनं झामुमोवर घराणेशाहीचा आरोप केला आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते बाबुलाल मरांडी यांनी ट्विट करुन देखील झामुमोवर घराणेशाहीचा आरोप केला आहे.
Jharkhand BJP 16 MLA Hemant Soren JMM