हाजीपूर (बिहार) – गर्दीच्या भागात अनवरपूर चौकानजिक असलेल्या आदित्य ज्वेलर्सवर सायंकाळच्या सुमारास दरोडा टाकण्यात आला. दरोडेखोरांनी एक कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि सुमारे नऊ लाख रुपये रोख लुटले. यात चोरट्यांनी दुकानात उपस्थित असलेल्या दोन ग्राहकांना हाताशी धरून महिला ग्राहकाचे मोबाईल, पर्ससह दुकानातील कर्मचाऱ्यांचे दागिनेही लुटले. विशेष म्हणजे हे अर्धा डझन गुन्हेगार दुकानदाराचा मोबाईल आणि सीसीटीव्हीचे डीव्हीआरही घेऊन पळाले.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची छाननी सुरू केली आहे. पोलीसांनी यांनी सांगितले की लूट किती आहे? हे अद्याप कळलेले नाही. मात्र दुकानदार त्यांच्या दागिने साठ्याची जुळवाजुळव करत आहेत, त्यानंतरच याबाबत काही माहिती स्पष्टपणे दिली जाईल.
संध्याकाळी ७ च्या सुमारास या दुकानावर दरोडा पडला. सुमारे अर्धा डझन दरोडेखोरांनी या ज्वेलर्सच्या दुकानावर अचानक हल्ला केला. यापैकी तीन दरोडेखोरांनी दुकानात घुसून शस्त्राच्या बळावर दुकानदार व ग्राहकाला ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर दुकानातून सर्व दागिने लंपास करण्यात आले. त्याचवेळी त्यांनी दुकानदाराचा मोबाईलही हिसकावून घेतला. याच दरम्यान दुकानात दागिने खरेदी करण्यासाठी येथे आपल्या मुलासह आलेल्या महिलेलाही लुटण्यात आले. गुन्हेगारांनी किशोरवयीन मुलाची साखळी, पैसे आणि मोबाईलही काढून घेतला. या घटनेत एकूण एक कोटींहून अधिक रुपयांचे दागिने आणि रोकड लुटण्यात आल्याचे दुकानदार अमृत शेठ यांनी सांगितले.