विशेष प्रतिनिधी, मुंबई
चित्रपट असो टीव्ही मालिका यातील अभिनेते आणि अभिनेत्री यांच्याकडे नेमकी किती संपत्ती आहे? तसेच त्यांचे अन्य व्यवसाय काय? याविषयी सर्वांनाच उत्सुकता असते. त्याबद्दल जाणून घेण्यासाठी प्रत्येकाचा प्रयत्न असतो. सध्या टीव्ही कार्यक्रमातील प्रमुख अभिनेत्री दररोज चर्चेत असतात. त्याचबरोबर एखादी अभिनेत्री प्रेक्षकांची मने जिंकते. अशीच एक अभिनेत्री म्हणजे ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ या प्रसिद्ध मालिकेतील जेठालालची पत्नी ‘गुलाबो’ म्हणजेच अभिनेत्री सिंपल कौल होय.
अनेक वर्षांपासून सुरु असलेली टीव्हीवरील ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ ही मालिका खूपच लोकप्रिय असून यातील कलाकार देखील अनेकांना आवडतात. तसेच यातील काही कलाकार तर लोकांना आपल्या सोसायटीतील किंवा परिसरातीलच वाटतात. यातील जेठालालची पत्नी म्हणून काही काळ आलेली गुलाबो ही भूमिका अभिनेत्री सिंपल कौल साकारली होती. वास्तविक जीवनात सिंपल कौल ही खूप ग्लॅमरस आहे. या मालिकेत ती साधी दिसली. ‘गुलाबो’ या व्यक्तिरेखेत सिंपल कौर हिने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले व मने जिंकली.
‘जेठालाल’ ची पत्नी म्हणून आलेल्या ‘गुलाबो’ ला बघून प्रत्येकजण थक्क झाले. ती गोकुळधाम सोसायटीत पोहोचली, तेव्हा लोकांना ही भूमिका इतकी आवडली की ती वर्षभर ‘तारक मेहता का.. या मालिकेमध्ये राहिली होती. तथापि, तीन हा कार्यक्रम सोडला.
त्यानंतर ‘शरारत’, ‘सास बीना ससुराल’, ‘बा बहु और बेबी’ आणि ‘कुसुम’ सारख्या अनेक कार्यक्रमांमध्ये ती सहभागी होती. अभिनेत्री सिंपल कौल ही एक व्यवसायिक महिला देखील असून तीची मुंबईत ३ मोठी रेस्टॉरंट आहेत. तसेच रिअल लाइफमध्ये खूप ती बोल्ड आणि ग्लॅमरस असून सोशल मीडियावर ती चाहत्यांशी सतत कनेक्ट असते.