नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृतसेवा) – सुमारे तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा जेट एअरवेजची विमानसेवा आकाशात उडण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यामुळे भारतीय विमानसेवा क्षेत्रात आणखी स्पर्धा निर्माण होणार आहे. भारतीय विमान प्रवांशांच्या दृष्टीने ही बाब फायद्याची ठरणार आहे, असे म्हटले जात आहे.
विशेष म्हणजे जेट एअरवेजची जुलै-सप्टेंबर या तिमाहीत ही विमानसेवा सुरू होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती एअरलाइनचे मुख्य कार्यकारी संजीव कपूर यांनी दिली.
या संदर्भात एका मुलाखतीत संजीव कपूर यांनी जेट एअरवेजच्या फ्लाइटबद्दल माहिती देताना सांगितले की, एप्रिलच्या अखेरीस विमान कंपनीला उड्डाणे चालवण्यास मान्यता मिळणे अपेक्षित आहे, नवीन आणि जुन्या दोन्ही भाडेतत्त्वांवर विमानांची पुरेशी उपलब्धता आहे.
तसेच संजीव कपूर यांनी स्पष्ट केले की, आपण विचार करू शकतो अशी बरीच विमाने आहेत. आमच्या गरजा आणि खर्चाचे फायदे लक्षात घेऊन आमच्यासाठी काय सर्वोत्तम आहे ते आम्ही ठरवू. मला नेमका आकडा द्यायचा नाही, पण आम्हाला त्याच्या गरजा आणि स्पर्धेची जाणीव आहे.
दरम्यान, जेट कंपनी प्रचंड कर्जात बुडाली होती, कारण जेट एअरवेजवर प्रचंड कर्ज होते. यामुळे सदर कंपनीने 2019 मध्ये विमानसेवा बंद केली होती. तथापि, मुरारी लाल जालान आणि CalRock कंसोर्टियमने जून 2021 मध्ये नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT)-नियंत्रित दिवाळखोरी आणि निराकरण प्रक्रियेत जेट एअरवेजची बोली जिंकली.