सिएटल (अमेरिका) – अमेरिकन अब्जाधीश जेफ बेजॉस यांची ब्लू ओरिजीन ही कंपनी २० जुलैपासून लोकांना अंतराळाची सैर करवून आणणार आहे. आपल्या न्यू शेफर्ड या नवीन विमानासाठी कंपनी लिलाव सुरू करणार आहे. पाच आठवड्यांच्या ऑनलाइन लिलावानंतर मिळणारी रक्कम ही कंपनीच्या फाऊंडेशनला दिली जाईल. याअंतर्गत गणित आणि विज्ञानाच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे.
चंद्रावर मानवाचे पहिले पाऊल २० जुलै १९६९ रोजी पडले होते. यामुळेच अंतराळाची सैर करण्यासाठी कंपनीने ही तारीख निश्चित केली आहे. या पहिल्या उड्डाणात कंपनी एका प्रवाशाला ११ मिनिटे अंतराळात नेऊन आणणार आहे. यात या जमिनीपासून १०० किमी. वरती उडण्याची संधी मिळणार आहे. यात ग्राहकांना चार दिवसांचा अनुभव मिळेल. पहिल्या तीन दिवसांत टेक्सास येथील कंपनीच्या लाँच साईटवर अंतराळ उड्डाणाचे प्रशिक्षण दिले जाईल.
कंपनीच्या न्यू शेफर्ड रॉकेट ऍण्ड कॅप्सूल कॉम्बोमध्ये एका वेळी सहा प्रवाशांना अंतराळात नेण्याची सोय करण्यात आली आहे. इथे त्यांना गुरुत्वाकर्षण विरहित वातावरणाचा अनुभव मिळेल. या कॅप्सूलमध्ये ६ ऑब्झर्व्हेशन विंडो असून त्या बोइंग ७४७ च्या तिप्पट आहेत.
१४ एप्रिलच्या टेस्ट उड्डाणानंतर बेजॉस यांनी सोशल मीडियाद्वारे अंतराळ यात्रेचे संकेत दिले होते. ब्लू ओरिजिनचे संचालक एरियन कॉर्नेल यांनी सांगितले की, १५ रॉकेटचे टेस्ट उड्डाण १६ कॅप्सूलचे लँडिंग पाहिल्यानंतर आम्ही अंतराळ यात्रेसाठी संपूर्णपणे सज्ज आहोत.
अंतराळात जाण्याची इच्छा असणाऱ्यांना आणखीही काही खाजगी कंपन्यांचे पर्याय उपलब्ध आहेत. एलन मस्क यांची स्पेस एक्स्प्लोरेशन टेक्नॉलॉजीज कॉर्पाेरेशन आणि रिचर्ड ब्रानसनच्या वर्जिन गॅलेटिक्स होल्डिंग्ज इंक या कंपन्या ही संधी देऊ इच्छितात.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!