नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – JEE आणि NEET परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. तुम्हाला मोफत कोचिंग मिळू शकते. त्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. एकूण ११० विद्यार्थ्यांना या कोचिंगचा लाभ घेता येणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल मागील वर्षीच्या सुपर-५० उपक्रमाच्या धर्तीवर सदर उपक्रमाच्या विद्यार्थी संख्येत वाढ केली असून शैक्षणिक वर्ष सन २०२३-२४ व २०२४-२५ या दोन वर्षांसाठी सदर उपक्रमास खालील प्रमाणे एकुण ११० विद्यार्थ्यांची JEE व NEET साठी निवड केली जाणार आहे. दोन्ही अभ्यासक्रमासाठी 2/2 दिव्यांग विद्यार्थी पण पात्र राहणार आहेत, तशी माहिती गटशिक्षणाधिकारी
डॉ मिता चौधरी यांनी दिली आहे.
विद्यार्थ्यांची पात्रता :-
१) विद्यार्थी नाशिक जिल्हयातील ग्रामिण भागातील शासकीय, अनुदानित, अंशत: अनुदानित विद्यालयातून माहे मार्च २०२३ मध्ये इ. १० वीच्या परीक्षेत ७० टक्के गुणांनी उत्तीर्ण झालेला असावा. कोणत्याही जात प्रवर्गातील विद्यार्थी अर्ज भरण्यास पात्र आहे. विना अनुदानित, स्वयंअर्थसहाय्यीत शाळांमधील विद्यार्थ्यांनी अर्ज करु नये.
२) सदर योजनेचा लाभ घेण्यास इच्छूक असणाऱ्या विद्यार्थ्यास सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात विज्ञान शाखेत प्रवेश घेणे बंधनकारक राहील..
३) विद्यार्थ्याच्या पालकांचे उत्पन्नाची कमाल मर्यादा १ लक्ष इतकी असावी. उत्पन्नाचा दाखला दिनांक ३१/३/२०२३ पावेतो वैध असलेला समक्ष प्राधिका-यांनी दिलेला असावा.
४) सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेले अधिवास (डोमिसाईल ) प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. विद्यार्थ्याचा अधिवास नाशिक जिल्हयातील ग्रामीण भागातील असावा. नाशिक महानगरपालिका क्षेत्रात अधिवास असणारे विद्यार्थी पात्र नाहीत.
५) अनुसूचित जाती / जमाती या सामाजिक प्रवर्गाच्या विद्यार्थ्याकडे सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेला जातीचा दाखला असावा.
६) दिव्यांग विद्यार्थ्यांना किमान ४०% दिव्यांगत्व असल्याचे समक्ष प्राधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
७) सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छूक विद्यार्थ्यांना निवड चाचणी परीक्षा अनिवार्य राहील तसेच सदर निवड चाचणी परीक्षेत उच्चतम् गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची निवड मर्यादित स्वरुपात करण्यात येईल.
८) निवड चाचणीसाठी नोंदणीकृत विद्यार्थ्यांची लेखी स्वरुपातील निवड चाचणी आयोजित करण्यात येईल. निवड चाचणीमध्ये उच्चतम् गुण मिळविणाऱ्या पहिल्या ११० विद्यार्थ्यांची JEE व NEET या व्यावसायिक पात्रता प्रवेश परीक्षांकरिता मार्गदर्शन व अभ्यासक्रम पूर्ण करणेकरीता निवड केली जाईल व अशा विद्यार्थ्यांना JEE व NEET या परीक्षांचे व्यावसायिक प्रशिक्षण शैक्षणिक संस्थेकडून निशुल्क दिले जाईल.
९) सदर उपक्रमात निवड झालेल्या विद्यार्थ्यास प्रशासनाने निश्चित केलेल्या शैक्षणिक संस्थेत दोन वर्ष निवासी निःशुल्क प्रशिक्षण घेणे बंधनकारक राहील. प्रशिAक्षण अभ्यासक्रम अर्धवट स्वरुपात सोडता येणार नाही. त्याकरिता विद्यार्थ्याची व पालकांची तयारी/संमती आवश्यक राहील.
१०) विद्यार्थ्यांना उपक्रम निवड चाचणी परीक्षेचा अर्ज शाळांना PDF स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात आला आहे. संबंधित मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना अर्ज करुन देण्यात यावा तसेच सदर अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना सहाय्य करावे.
११) विद्यार्थ्यांनी तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी कार्यालयात अर्ज कागदपत्रांसह जमा करावेत.
*अर्ज करण्याचा कालावधी दि. १२/६/२०२३ ते २६/६/२०२३*
परीक्षा केंद्र
प्रत्येक तालुकास्तरावर परीक्षा केंद्र राहील.
*परीक्षेचा दिनांक*
रविवार दि. २/७/२०२३ रोजी वेळ सकाळी १०.०० ते दुपारी १२.३०
१२) विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर सकाळी ९.०० वाजता उपस्थित राहावे.
१३) एखादा विद्यार्थी मार्च, २०२२ मध्ये १० वी उत्तीर्ण झाला असेल अशा विद्यार्थ्यांची उपक्रमासाठी निवड झाल्यास त्यास पुनश्च इयत्ता ११ वीत प्रवेश घ्यावा लागेल. १४) विद्यार्थ्यांना आपल्या इच्छेनुसार परीक्षेचा तालुका निवडता येईल तसे त्यांनी सदर तालुक्याचे नाव परीक्षा अर्जात नमूद करावे. एकदा परीक्षेसाठी तालुका निश्चित केल्यावर त्यात बदल करता येणार नाही.
१५) सदर उपक्रम JEE व NEET या दोन अभ्यासक्रमासाठी असल्याने दोन स्वंतंत्र गुणवत्ता यादया प्रसिध्द करण्यात येतील.
१६) JEE या अभ्यासक्रमासाठी Physics, Chemistry, Maths व English यात मिळालेल्या गुणांचे आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.
१७) NEET या अभ्यासक्रमासाठी Physics Chemistry, Biology व English यामध्ये मिळालेल्या गुणांचे आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.
१८) परीक्षेचे स्वरुप :- परीक्षा वस्तनिष्ट बहुपर्यायी स्वरुपाचे प्रश्न असतील. PHYSICS, CHEMISTRY, MATH., BIOLOGY, ENGLISH या पाच विषयांवर प्रत्येकी 25 गुण असणार आहेत.
19)उत्तरपत्रिकेसाठी OMR Answer Sheet चा वापर करण्यात येईल.
२०) विद्यार्थ्यांनी आपले बैठक क्रमांक पाहण्यासाठी जिल्हा परिषदेची वेबसाईट www.zpnashik.maharashtara.gov.in या संकेतस्थळाचे अवलोकन करावे.
तरी नाशिक तालुक्यातील सर्व पात्र विद्यार्थ्यांनी तसेच इतर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी आपल्याला तालुक्यातील शिक्षण विभागात अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन मा. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, व मा. गटविकास अधिकारी डॉ सारिका बारी यांनी केले आहे.
JEE Neet Student Free Coaching Nashik ZP