इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – टेस्टिंग एजन्सी/एनटीएने संयुक्त प्रवेश परीक्षेच्या सत्र एक परीक्षेचा म्हणजेच जेईई मेन २०२२ निकाल जाहीर केला आहे. काल रात्री ऑनलाइन माध्यमातून निकाल जाहीर करण्यात आला. जेईईच्या अधिकृत पोर्टलवर निकाल पाहता येणार आहे. जे उमेदवार यावेळी जेईई मुख्य सत्र – १ मध्ये, अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षेत बसले होते, ते jeemain.nta.nic.in या वेबसाइटवर जाऊन निकाल तपासू आणि डाउनलोड करू शकतात.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे २३ जून २०२२ रोजी जेईई मेन जून सत्राच्या परीक्षा सुरू झाल्या. पहिल्या दिवशी बी आर्किटेक्चर अभ्यासक्रमासाठी परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर २४ जून ते ३० जून २०२२ या कालावधीत बी.टेक आणि बीई अभ्यासक्रमांसाठी परीक्षा घेण्यात आली. जेईई मेन ही अर्जांच्या संख्येवर आधारित देशातील तिसरी सर्वात मोठी प्रवेश परीक्षा आहे.
आकडेवारीनुसार ९ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केले होते. देशभरात विविध ठिकाणी कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून ही परीक्षा घेण्यात आली. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नुकतीच जेईई मेन परीक्षेची अंतरिम आन्सर – की जाहीर केली होती. आता निकाल जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे.
निकाल असा डाउनलोड करा
परीक्षेत बसलेले विद्यार्थी अतिशय सोप्या पद्धतींचा अवलंब करुन निकाल तपासू शकतात. त्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in ला भेट द्या. त्यानंतर होम पेजवर दिसणार्या JEE मेन २०२२ सत्र १ च्या निकालाशी संबंधित लिंकवर क्लिक करा. यानंतर तुम्ही आता नवीन पेजवर याल. विनंती केलेली माहिती भरुन लॉग इन करा. आता निकालाची फाईल PDF स्वरूपात स्क्रीनवर दिसेल. ते तपासा आणि डाउनलोड करा आणि पुढील वापरासाठी त्याची प्रिंट आउट सेव्ह करुन ठेवा.
या वेबसाइट्सवरही पाहता येईल
www.jeemain.nta.nic.in2022
nta.ac.in
ntaresults.nic.in निकाल2022
JEE Main Result Declare today How to See and Download read this