नवी दिल्ली – राष्ट्रीय चाचणी एजन्सीने (NTA) संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्य (JEE मेन २०२१)ची घोषणा केली आहे. परीक्षेचे पहिले सत्र २२ ते २५ फेब्रुवारी या काळात होणार आहे. या परीक्षेसाठीची नोंदणीही सुरू झाली आहे. कोरोना विषाणूमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षावर मोठा परिणाम झाला आहे. त्याची दखल घेत एनटीएने या परीक्षेच्या पद्धतीतही बदल केला आहे. ही परीक्षा १३ भाषांमध्ये घेतली जाणार आहे. ही परीक्षा देण्याची (अटेम्प्ट) सुविधा वाढविण्यात आली आहे. फेब्रुवारीनंतर मार्च, एप्रिल आणि मे मध्ये ही परीक्षा होणार आहे.
अधिकृत आणि अन्य माहितीसाठी खालील लिंकला भेट द्यावी