नवी दिल्ली – जेईई मेनच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची आज (४ एप्रिल) अंतिम मुदत आहे. परीक्षा आयोजित करणारी नॅशनल टेस्टिंग एजन्सी एप्रिलच्या सत्रासाठी रात्री ११.५० वाजता नोंदणी खिडकी बंद करणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अद्याप अर्ज भरला नाही, ते nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू भरू शकणार आहे. त्याशिवाय खाली दिलेल्या लिंकवर जेईई मेन एप्रिल सत्राचा अर्ज भरू शकणार आहेत. ऑनलाइन शुल्क भरण्यासाठी अंतिम तारीख ५ एप्रिल २०२१ देण्यात आलेली आहे.
जेईई मेन एप्रिल सत्राच्या परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी एनटीए जेईईचे अधिकृत संकेतस्थळ jeemain.nta.nic.in वर जावे. त्यानंतर होम पेजवर असलेल्या जेईई मेन २०२१ नोंदणी लिंकवर क्लिक करावे. त्यावर नवे पेज उघडेल. तिथे उमेदवारांना अर्ज भरावा लागणार आहे. अर्ज जमा करून पेज डाउनलोड करावा. पुढील गरजेसाठी त्याची हार्ड कॉपी जवळ बाळगावी.
एनटीएतर्फे जेईई मेन एप्रिल सत्राच्या परीक्षेसाठी नोंदणीप्रक्रिया २५ मार्चला सुरू झाली. एप्रिल सत्र ३ पेपर १(बीई. टेक.) साठी परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे. ही परीक्षा २७ एप्रिल, २८, २९ आणि ३० एप्रिलला घेतली जाणार आहे. परीक्षा दोन सत्रात आयोजित केली जाईल. त्यानुसार, पहिली परीक्षा सकाळी ९ ते दुपारी १२ आणि दुसरी परीक्षा दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आयोजित केली जाणार आहे.