नवी दिल्ली – JEE परीक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी मोठी घोषणा केली आहे. या परीक्षेसाठी इयत्ता बारावीत कमीत कमी ७५ टक्के गुण असल्याची अट यावर्षी राहणार नसल्याचे पोखरियाल यांनी सांगितले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. त्यात अनेक अडचणी आल्या. परिणामी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या गुणांवरही परिणाम होण्याची चिन्हे आहेत. ही बाब लक्षात घेऊनच सरकारने हा निर्णय घेतला आहे.
https://twitter.com/DrRPNishank/status/1351449415425396736