हजीपूर नगर (बिहार) – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बिहार राज्य सरकारने नाईट कर्फ्यू लागू केला आहे, तसेच कोरोनाबाबत जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे निर्देशही दिले आहेत, परंतु एक व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लालगंजचे माजी आमदार मुन्ना शुक्ला यांचे पुतणे या मार्गदर्शक तत्त्वाचे उल्लंघन करत असल्याचे दिसत आहेत. राजकीय नेत्याच्या पुतण्याचा कारनाम्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे.
माजी आमदाराच्या अंगरक्षकाने कार्बाईन गोळीबार केल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. सदर एसडीपीओ लालगंज येथे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दाखल झाले आणि या प्रकरणात पोलिसांनी माजी आमदार, भोजपुरी सिनेमा अभिनेत्री अक्षरा सिंह यांच्यासह २०० अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.
दरम्यान, या घटनेसंदर्भात असे म्हटले जाते की, लालगंजचे माजी आमदार मुन्ना शुक्ला यांचे पुतणे आणि मुजफ्फरपूर उपमहापौर मनमर्दन शुक्ला यांनी एक समारंभ आपल्या वडिलोपार्जित लालगंज परिसरातील बंगल्यात आयोजित केला होता. त्या नंतर रात्री झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात भोजपुरी सिनेमा अभिनेत्री अक्षरा सिंह नाचत असून याच कार्यक्रमाच्या व्हिडिओमध्ये माजी आमदाराचा बॉडीगार्ड स्टेजसमोर तिच्या कार्बाईनवरून गोळीबार करत असल्याचे दिसत आहे.
https://twitter.com/TimesNow/status/1386139058716348419