नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा): शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत घेण्यात आलेल्या जी.डी.सी. ॲण्ड ए व सी.एच.एम परीक्षा 2024 चा निकाल 29 नोव्हेंबर 2024 रोजी घोषित झाला आहे. हा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर लॉगइन व पासवर्ड वापरून पाहता येईल, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था नाशिक चे उपनिबंधक फयाज मुलाणी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
या परीक्षांचा निकाल पी.डी.एफ. स्वरूपात https://sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर महत्वाचे दुवे मधील जी.डी.सी ॲण्ड ए. मंडळ येथे पहावयास उपलब्ध आहे. फेर गुण मोजणी करण्यासाठी विद्यार्थ्यांना 4 डिसेंबर 2024 ते 5 जानेवारी 2025 पर्यंत (रात्री 22.30) वाजेपर्यंत https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर लॉगइन व पासवर्ड वापरून अर्ज करण्याची संधी उलब्ध आहे.
फेर गुण मोजणी करण्यासाठी परीक्षार्थी यांनी फेर गुण मोजणी शुल्क भारतीय स्टेट बँक (SBI) बँकेच्या कोणत्याही शाखेत प्रत्येक विषयासाठी रूपये 75 अधिक बँक चार्जेस याप्रमाणे चलनाद्वारे भरावे लागेल. बँकेचे चलन प्राप्त करून घेण्याची मुदत दिनांक 5 जानेवारी 2025 पर्यंत (रात्री 22.30) वाजेपर्यंत उपलब्ध राहील. सदर चलन बँकेत दिनांक 5 डिसेंबर 2024 ते 8 जानेवारी 2025 रोजी पर्यंत बँकेच्या कामकाजाच्या वेळेत भरणा करता येईल. विहित तारखेनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जावर विचार करण्यात येणार नाही, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.