इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अनेक पक्ष्यांच्या मृत्यूचा हृदयद्रावक व्हिडिओ समोर आला आहे. झाडावर पक्ष्यांनी घरटे बनवल्याने हा प्रकार घडला. बुलडोझरच्या साह्याने हे झाड तोडण्यात येताच झाडासोबतच त्यामध्ये उपस्थित असलेल्या पक्ष्यांचाही मृत्यू झाला. हे पक्षी रस्त्याच्या कडेला झाडांसोबत विखुरलेले असतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
हे प्रकरण केरळमधील मलप्पुरम भागातील असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, हा व्हिडिओ आयएफएस अधिकारी प्रवीण कासवान यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले- “प्रत्येकाला घर हवे असते. आपण किती क्रूर असू शकतो? स्थान अज्ञात.” त्यांची पोस्ट काही तासांत 7000 वेळा रिट्विट झाली आहे. 44 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये लोकांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
व्हिडिओमध्ये केरळमधील मलप्पुरम भागात राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारासाठी एक जेसीबी झाड तोडताना दिसत आहे. झाड पडल्याने पक्ष्यांचा मोठा कळपही त्यातून उडून जातो. सोबतच घरटेही तुटून रस्त्यावर पडतात. काही क्षणात अनेक मृत पक्षी झाडांसोबत रस्त्यावर विखुरलेले दिसतात.
https://twitter.com/ParveenKaswan/status/1565542250158837761?s=20&t=v3LSVBOWD4HAob8V7znp0w
या घटनेबाबत केरळ वन विभागाने वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वृत्तानुसार, अधिकृत मंजुरीशिवाय झाड तोडण्यात आले. त्यानंतर जेसीबी चालकाला अटक करण्यात आली.
ही घटना क्रूर असल्याचे सांगून वनमंत्री एके ससेंद्रन म्हणाले की, त्यांच्या विभागाच्या परवानगीशिवाय ही घटना घडली आहे. ते म्हणाले की, पक्षी आणि घरटी असलेली झाडे संपेपर्यंत तोडू नयेत, असे वनविभागाचे कडक निर्देश आहेत.
सार्वजनिक बांधकाम मंत्री मुहम्मद रियास यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून अहवाल मागवला आहे. निलांबूर उत्तर विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, याची पुढील चौकशी केली जाईल आणि संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.
JCB Tree Cutting Hundreds of Birds Nest Crime Murder
Death Forest Viral Video Malappuram