नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)च्या नंदुरबार शाखेने नाशिक जिल्ह्यात कारवाई करुन पोलिस अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. जायखेडा पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेला सहायक पोलिस उपनिरीक्षक जगन्नाथ लाला महाजन (वय ५७ वर्षे) असे या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. एका गुन्ह्यात आरोपींचे नाव कमी करण्यासाठी त्याने तब्बल ४० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यातील पहिला हप्ता असलेले १० हजार रुपये स्विकारताना तो एसीबीच्या पथकाला सापडला आहे. याप्रकरणी महाजनला ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
एसीबीने दिलेली माहिती अशी
युनिट:- नंदुरबार
तक्रारदार:- पुरुष, वय – 32 वर्षे
आरोपी:- सपोउपनि/ जगन्नाथ लाला महाजन, वय 57 वर्ष, व्यवसाय-नोकरी, नेम.जायखेडा पोलीस स्टेशन, नामपूर दुरक्षेत्र, ता. सटाणा, जि. नाशिक
पडताळणी:- दि.26.03.2022
सापळा कारवाई:- दि.26.03.2022
लाचेची मागणी:- 40,600/- रुपये.
लाच स्वीकारली:- 10,000/- रूपये.
हकीकत:-
यातील तक्रारदार, त्यांचे आई-वडील व दोन्ही बहीण अशा पाच जणांविरुद्ध भा.द.वि. कलम 498 (अ), 323,504,506,34 अन्वये गुन्हा दाखल असून त्यात तक्रारदार यांची आई व दोन्ही बहिणी यांची नावे गुन्ह्यातून कमी करणेसाठी 40,600/- रुपयांची लाचेची मागणी करून त्याचा पहिला हप्ता 10000/- रु. पंच साक्षीदारांसमोर स्वीकारलेली आहे. आलोसे यांना नामपूर दूरक्षेत्र, ता.सटाणा येथून ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
आलोसे यांचे सक्षम अधिकारी:-
मा. पोलीस अधीक्षक सो., नाशिक ग्रामीण.
सापळा मार्गदर्शक अधिकारी:-
मा. श्री. सुनील कडासने सो., पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि., नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
मा. श्री. नारायण न्याहाळदे सो., अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि., नाशिक परीक्षेत्र, नाशिक.
मा. श्री. सतीश भामरे सो. पोलीस उपअधीक्षक (वाचक) ला.प्र.वि., नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
सापळा पर्यवेक्षण अधिकारी:-
राकेश आ. चौधरी, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि., नंदुरबार.
सापळा अधिकारी:-
पोलीस निरीक्षक, समाधान म. वाघ, ला.प्र.वि., नंदुरबार
सापळा पथक:-
पोह/उत्तम महाजन, पोहवा/विजय ठाकरे, पोना/ देवराम गावित व पोना/मनोज अहिरे सर्व नेम. ला.प्र.वि., नंदुरबार.
याद्वारे सर्व नंदूरबार जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
तक्रार देण्यासाठी
नंदुरबार एसीबी कार्यालय फोन नं.:- 02564-230009
Toll free No.:-1064
Email:- dyspacbnandurbar@maharashtra.gov.in