मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महापुरुषांचा अवमान करणाऱ्या आणि राज्यघटनेच्या विरोधात काम करून घटनाबाह्य सरकारला शपथ देणाऱ्या महोदयांमुळे राज्यपालपदाची शोभा कमी झाली आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या राजीनाम्यावर आपली भूमिका ट्वीट करत स्पष्ट केली आहे. महाविकास आघाडीची राज्यपाल बदलण्याची मागणी होतीच, म्हणूनच महाराष्ट्रात नवीन राज्यपाल येणार या वृत्ताचे आम्ही स्वागत करतो असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
नवीन राज्यपाल आधीच्या महोदयांप्रमाणे भाजपच्या हातचे बाहुले बनणार नाहीत, अशी आशा जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा- सावित्रीमाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो ! या महामानवांचा जयघोष जयंत पाटील यांनी केला आहे.
https://twitter.com/Jayant_R_Patil/status/1624624846369095681?s=20&t=G28fJ8Pgkvb1J1mHtom-6Q