इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्याच्या वृत्तामुळे राजकीय चर्चेला उधान आले आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे प्रवक्ते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जयंत पाटील साहेब हे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या राजीनाम्याच्या बातम्या प्रसारीत होणे, हा निव्वळ खोडसाळपणा आहे. पक्ष एका नियमानुसार अन् शिस्तीनुसारच चालत असतो असे म्हटले आहे.
एकीकडे जितेंद्र आव्हाड यांनी हे वृत्त फेटाळले असले तरी ज्यांच्या नावाची नवीन प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चा आहे. ते शशिकांत शिंदे यांनी सांगितले की, प्रदेशाध्यक्षाबाबत अजून नाव निश्चित नाही. पवारसाहेब, सुप्रियाताई, जयंत पाटील आणि पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असल्याचे सांगितले. १५ तारखेला बैठक आहे. काही नावं चर्चेत आहेत. माझंही नाव चर्चेत असल्याचे सांगितले.
विशेष म्हणजे दुसरीकडे रोहित पवार यांनी राजीनाम्याचे वृत्त मान्य केले आहे. नवीन प्रदेशाध्यक्ष १५ जुलै रोजी जाहीर होईल. ते नाव जयंत पाटील हेच जाहीर करतील असे म्हटले आहे.