मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांनी आमच्यासाठी शिवाजी महाराज आराध्य दैवत आहे. मी आज डोकं झुकवून माझ्या आराध्यदैवतेला चरणावर मस्तक ठेवून माफी मागतो. आमचे संस्कार वेगळे आहेत असे सांगितले. त्याअगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माफी मागितली.
या सर्व माफी नंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाला महाराजांनी कधीच माफी दिली नव्हती. आमचा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवलेल्या वाटेवर चालतो. त्यामुळे साहेब, महाराष्ट्र या चुकीला माफी देऊ शकणार नाही. प्रायश्चित अटळ आहे. जय शिवराय
शिवद्रोह्यांना आता माफी नाही… तमाम शिवप्रेमींनो, १ सप्टेंबर २०२४ राखून ठेवा आणि हुतात्मा चौक मुंबई येथे एकत्र या..!